Home जालना 77व्या निरंकारी समागमाच्या सेवांचा विधिवत शुभारंभ

77व्या निरंकारी समागमाच्या सेवांचा विधिवत शुभारंभ

14
0

आशाताई बच्छाव

1000822188.jpg

77व्या निरंकारी समागमाच्या सेवांचा विधिवत शुभारंभ
सेवेमध्ये कोणताही भेदभाव न बाळगता ती निष्काम भावनेने करावी
– सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: या जगामध्ये अनेक प्रकारचे लोक राहतात.  त्यांची भाषा, वेशभूषा, आहार, जात, धर्म, संस्कृती वेगवेगळे आहे. या सगळ्या विभिन्नता असूनही आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट सारखी आहे आणि ती म्हणजे आपण सर्व मनुष्य आहोत. आपला वर्ण कोणताही असो, वेशभूषा कशीही असो, देश कोणताही असो किंवा खाणे-पिणे कसेही असो; सर्वांच्या धमण्यांमध्ये एकसारखेच रक्त वाहत आहे आणि सगळे एकसारखाच श्वास घेत आहेत. आपण सर्व परमात्म्याची लेकरं आहोत. हीच भावना अनेक संतांनी वेगवेगळ्या समयी आणि वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या भाषेतून आपापल्या शैलीमध्ये ‘समस्त संसार, एक परिवार’ या संदेशाच्या रूपात व्यक्त केली. मागील सुमारे 95 वर्षांपासून संत निरंकारी मिशन हाच संदेश केवळ प्रेषित करत आहे इतकेच नव्हे तर अनेक सत्संग आणि समागमांचे नियमितपणे आयोजन करुन या संदेशाचे जीवंत उदाहरण प्रस्तुत करत आहे. मिशनचे लक्षावधी भक्त यावर्षीही 16, 17 आणि 18 नोव्हेंबर, 2024 रोजी संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा, हरियाणा येथे होऊ घातलेल्या 77व्या वार्षिक निरंकारी संत समागमामध्ये पोहचून मानवतेच्या महाकुंभमेळ्याचे दृश्य साकार करणार आहेत. देश-विदेशातून येणारे भक्तगण जिथे सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि सत्कारयोग्य निरंकारी राजपिता रमितजी यांचे पावन दर्शन घेऊन कृतार्थतेचा अनुभव घेतीलच, शिवाय एकोप्याने संत समागमातील शिकवणूकीतून आपली मनं उज्ज्वल करण्याचाही प्रयास करतील.
या संत समागमाची भूमी समागमासाठी तयार करण्याच्या सेवेचा शुभारंभ आज 6 ऑक्टोबर रोजी प्रतिवर्षाप्रमाणे सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

Previous articleमोठ्या शक्तीप्रदर्शनासह आ. कैलास गोरंट्याल यांचा उमेदवारीसाठी दावा
Next articleग्राहक परिषदेत तक्रारींचे निराकरण करण्यात अपयश आठही तालुक्यात लोकशाही दिन घेण्याची सदस्य रमेश तारगे यांची मागणी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here