Home जालना मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आ. कैलास गोरंट्याल यांचा उमेदवारीसाठी दावा

मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आ. कैलास गोरंट्याल यांचा उमेदवारीसाठी दावा

14
0

आशाताई बच्छाव

1000822186.jpg

मोठ्या शक्तीप्रदर्शनासह आ. कैलास गोरंट्याल यांचा उमेदवारीसाठी दावा
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ: आगामी विधानसभा निवडणुकीत जालना विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी आ. कैलास गोरंट्याल यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत पक्षाच्या निरीक्षक खा. डॉ. शोभाताई बच्छाव यांच्याकडे आज दावा केला. यावेळी उपस्िथत समर्थक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी गोरंट्याल यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पाश््र्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पक्षाच्या वतीने जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आज सोमवारी पाठक मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी पक्ष निरीक्षक खा. डॉ. शोभाताई बच्छाव यांच्यासह खा. डॉ. कल्याण काळे, प्रदेश उपाध्यक्ष आ. कैलास गोरंट्याल, आ. राजेश राठोड, जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष राजाभाऊ देशमुख, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, युवा नेते अक्षय गोरंट्याल, अन्वर देशमुख, शहर जिल्हाध्यक्ष शेख महेमूद, जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, कल्याणराव बोराडे, विजय चौधरी, अविनाश चव्हाण आदींची व्यासपीठावर उपस्िथती होती. यावेळी आ. कैलास गोरंट्याल यांचे समर्थक वाजेद खान, महावीर ढक्का , आरेफ खान, जगदीश भरतीया, रऊफ परसुवाले, अनिल पाखरे आदींनी आ. कैलास गोरंट्याल हे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे असून, त्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा पक्ष निरीक्षकांसमोर मांडला. तसेच पक्षाशी एकनिष्ठ नसलेल्या आणि पक्षासाठी कोणतेही योगदान न देणाऱ्या व्यक्तींचा उमेदवारीसाठी विचार न करता, आ. गोरंट्याल यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी करत त्यांना मोठ्या मतािधक्क्याने विजयी करण्याची ग्वाही पक्ष निरीक्षकांना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here