Home जालना जालना विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊन भास्कर अंबेकर यांना उमेदवारी द्या – शिवसेना...

जालना विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊन भास्कर अंबेकर यांना उमेदवारी द्या – शिवसेना पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जोरदार मागणी

15
0

आशाताई बच्छाव

1000822184.jpg

जालना विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊन भास्कर अंबेकर यांना उमेदवारी द्या
– शिवसेना पदाधिकार्‍यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे जोरदार मागणी
जालना, दि. ७(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-जालना विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव
बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख हरिहर शिंदे यांच्या नेतृत्वात
पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबई
येथील त्यांच्या मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. जालना विधानसभेत
आजपर्यंत चार वेळा शिवसेना पक्षाचा आमदार निवडून आलेला आहे. जालना नगर
परिषदेतही गेली अनेक वर्षे शिवसेनेचाच झेंडा होता. त्यामुळे या मतदार
संघात पक्षाला मानणारा मोठा मतदार आहे. जालना मतदार संघ महाविकास
आघाडीच्या जागा वाटपात लोकसभेला काँग्रेसला सुटल्याने जालना विधानसभेची
जागा शिवसेनेला सोडवून घेऊन शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांना
उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली.
भास्कर अंबेकर हे गेली ३८ वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून
कार्यरत आहेत. पक्षाच्या फुटी नंतरही ते शिवसेनेतच राहिले. अनेकविध
पक्षांनी त्यांना आपल्या पक्षाकडून उमेदवारी देऊ केली असतानाही
पक्षनिष्ठा न सोडता त्यांनी शिवसेनेतच काम केले. शिवसेनेचे शहर प्रमुख,
उपजिल्हाप्रमुख व गेल्या पंधरा वर्षांपासून जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी
संघटना मजबूत केली.जालना नगरपरिषदेमध्ये अनेकवेळा नगरसेवक, दोन वेळा
नगराध्यक्ष म्हणून काम केले. आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत
त्यांनी अनेक विकास कामे केल्याने शहरवासीयांना त्यांची कारकीर्द कायम
संस्मरणीय आहे. त्यांचा दांडगा जनसंपर्क व सर्वांना सोबत घेऊन
चालण्याच्या दृष्टीमुळे ते लोकप्रिय आहेत.

Previous articleअंबड येथे आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण व शेतकरी  संघर्ष यात्रा निमित्त मेळावा
Next articleमोठ्या शक्तीप्रदर्शनासह आ. कैलास गोरंट्याल यांचा उमेदवारीसाठी दावा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here