Home जालना अंबड येथे आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण व शेतकरी...

अंबड येथे आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण व शेतकरी  संघर्ष यात्रा निमित्त मेळावा

13
0

आशाताई बच्छाव

1000819142.jpg

जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ-. अंबड येथे आज अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून मराठा आरक्षण व शेतकरी  संघर्ष यात्रा निमित्त मेळावा आयोजित करण्यात आला  होता.
या मेळाव्याचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष मा.नानासाहेब जावळे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सोबत केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव भाऊ मराठे , प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, मराठवाडा कार्याध्यक्ष विलास बापू कोल्हे, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष किशोर पाटील शिरवत, जालना जिल्हाध्यक्ष राधेश्याम पवळ, , बीड जिल्हाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, धाराशिव जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळुंके,  जालना शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष शिवनाथ कळवणे, नानासाहेब जोगदंड, मच्छिंद्र चिंचोले, ज्योतीराम माने, ऋषी पाटील, रवी गव्हाणे, अदी मान्यवर उपस्थित होते या मेळ्यात संघटनेच केंद्रीय अध्यक्ष मा.नानासाहेब जावळे पाटील यांनी मार्गदर्शन केले.अखिल भारतीय छावा संघटना मराठा आरक्षणावर सदैव आग्रही राहीली आहे. गेल्या तीन दशकांपासून चालू असलेला हा लढा अजूनही चालूच आहे.
आत्महत्या बलिदान उपोषण आंदोलने मोर्चे काढले परंतु मराठ्यांना म्हणावा तसा न्याय मिळाला नाही.
१)मराठ्यांचं हक्काचं इ डब्लू एस आरक्षणही गेलं ते पूर्ववत लागू करावे.
२)मराठा विद्यार्थी विद्यार्थिनीचे सर्व परीक्षांचे शैक्षणिक शुल्क फि सरकारने माफ करावी.
३)मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅझेट स्विकारून आरक्षण द्यावे.
४)स्व.आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावे आर्थिक महामंडळ स्थापन करून मराठवाड्यातील मराठा समाजासाठी १०००कोटी रूपयांची तरतूद करण्यात यावी.
५)शेतकरी सध्या त्रस्त झाले आहेत. सोयाबीनला भाव नाही
दुधाला दर नाही.
सरकारने सोयाबीनला ९,००० रू हमीभाव द्यावे.
६)शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याची तीही दिवसा वीज देण्यात यावी.
७)आजवरचे शेतीचे वीजबिल माफ करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here