Home जालना नविन मोंढा जालना येथुन ट्रकची चोरी

नविन मोंढा जालना येथुन ट्रकची चोरी

39
0

आशाताई बच्छाव

1000819090.jpg

नविन मोंढा जालना येथुन ट्रकची चोरी
जिल्हा प्रतिनिधी जालना -वसंतराव देशमुख
दिनांक 06/10/2024
याविषयी सविस्तर माहिती अशी की, दिनांक 01/10/2024 रोजी मध्य रात्री जालना येथील नवीन मोंढा परिसरात उभा असलेला ट्रक क्रमांक एम. एच. 18 एम, 4386, सहा टायर चोरीला गेला असल्याचे ट्रक मालक सचिन पांडुरंग वैद्य यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी संपूर्ण मोंढा परिसरात शोध घेतला असता गाडी मिळाली नाही.शोधुनही गाडी सापडली नाही यावरून ट्रक क्रमांक MH-18-4386 सहा टायर हि गाडी चोरीला गेली असल्याचा गाडी मालक सचिन पांडुरंग वैद्य रा.गायत्री नगर जालना यांच्या लक्षात आले.त्यामुळे त्यांनी सरळ चंदनझिरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली व दिनांक 02/10/2024 रोजी ट्रक क्रमांक MH-18M,4386 सहा टायर गाडी चोरीला गेली असल्याची तक्रार दाखल केली.
या तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, दिनांक 01/10-/2024 रोजी दुपारी 4:00 वाजता भाडे मारून माझी ट्रक ही पार्किंग जागा नसल्याने नवीन मोंढा खत मार्केट येथे पार्किंग मध्ये लावत असतो ती पार्क करून मी माझ्या घरी गेलो मी माझ्या गाडीला जीपीएस लावलेला आहे जेवण खावन करून मी झोपलो असता दिनांक 02/ 10/ 2024 रोजी रात्री 02:40 माझ्या गाडीचा जीपीएस सेटिंगचा आलार्म वाजल्याने मी झोपेतून उठून बघितले असता माझी ट्रक क्रमांक MH- 18.M,4386 ही दोन किलोमीटर लांब गेल्याची दिसली तेव्हा मी गडबडीत उठून मी माझ्या बाजूला राहत असणारा माझा भाऊ ज्ञानेश्वर पांडुरंग वैद्य याला उठवून माझी गाडी पार्किंग जवळून दोन किलोमीटर अंतरावर दिसत आहे तरी आपण दोघे भाऊ जाऊन बघून येऊ असे म्हणून मी माझ्या भावाला घेऊन पार्किंग ठिकाणी नवीन मोंढा खत मार्केट येथे जाऊन बघितले असता मला माझी गाडी पार्किंगला लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही.
दिनांक 2 /10 /2024 रोजी रात्री 2: 40 वाजता माझ्या ट्रकचा शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. ट्रक मिळून न आल्याने माझ्यावरील क्रमांकाचा ट्रक हा कोणीतरी चोरून नेला आहे अशी खात्री झाल्याने आज रोजी पोलीस स्टेशनला येऊन ट्रक चोरीची तक्रार देत आहे तरी माझा ट्रक क्रमांक MH,18 M. 4386 त्याची अंदाजे किंमत चार लाख रुपये जीचा चेसिस नंबर 373341MWZ734979असा व इंजिन नंबर 697टीसी45HWZ901220 असा असून चोरीला गेलेल्या ट्रकचा शोध घेण्यात यावा. माझा वरील फिर्यादी जबाब हा माझे सांगणे प्रमाणे संगणकावर टंकलिखित केला असून त्याची प्रत काढून ती मला वाचण्यासाठी दिली ती मी वाचून बघितली जी माझे सांगणे प्रमाणे बरोबर व खरी आहे. अशा प्रकारची लेखी तक्रार ट्रक मालक सचिन पांडुरंग वैद्य यांनी दाखल केली असून पुढील तपास चंदन जिरा पोलीस स्टेशन चे पोलीस पथक करत आहेत.

Previous articleजि.प.प्रा.शाळा निवडुंगा येथे दिलीपभाऊ वाघ यांच्या हस्ते बोरवेलचा लोकार्पण सोहळा संपन्न
Next articleनिवडणुकीतील राजकारण राजकारणात प्रामाणिकपणा उरला नाही. —
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here