Home जालना काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती

काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती

35
0

आशाताई बच्छाव

1000816289.jpg

काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती
—————————————-
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ –जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती दिनांक 7 ऑक्टोबर 2024 सोमवार रोजी दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत पाठक मंगल कार्यालय मुक्तेश्वर द्वार जुना जालना येथे पक्ष निरीक्षक खा. डॉ. शोभाताई बच्छाव या घेणार आहेत असे काँग्रेस पक्षाच्या वतीने एका पत्रकाद्वारे कळविले आहे .
जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छुक म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती निरीक्षक खासदार डॉक्टर शोभाताई बच्छाव घेणार असून,  याप्रसंगी खासदार डॉ. कल्याणराव काळे जालना लोकसभेचे निरीक्षक डॉ. पी .सी. शर्मा जिल्हा प्रभारी माजी आ. नामदेवराव पवार आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे याप्रसंगी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख , जालना शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख मेहमूद यांनी केले आहे .

Previous articleकाँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारी मुलाखती
Next articleया पित्याच्या चुकीला देशाची माफी नाही! -काय केले या क्रूर पित्याने ?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here