Home बुलढाणा चिखली त शेतीच्या वादातून पत्नी व तिच्या मावस भावाला दिली कारने जोरदार...

चिखली त शेतीच्या वादातून पत्नी व तिच्या मावस भावाला दिली कारने जोरदार धडक, पत्नीचा मृत्यू.

54
0

आशाताई बच्छाव

1000811042.jpg

चिखली त शेतीच्या वादातून पत्नी व तिच्या मावस भावाला दिली कारने जोरदार धडक, पत्नीचा मृत्यू.
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :– जिल्ह्यातील चिखली येथे घरगुती वादातून व तसेच शेतीच्या वादातून ३० सप्टेंबर रोजी चिखली येथील तहसील कार्यालय चौकात पतीने पत्नी व तिचा मावस भाऊ जोरदार कारने धडक दिली. या धडकेमध्ये महिला गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सविस्तर वृत्त असे की सविता समाधान सुरडकर रा.चिखली त्यांचा मावस भाऊ केशव भानुदास महाले रा. कव्हळा हल्ली मुक्काम कृष्ण नगर चिखली यांनी पोलिसांत दिलेल्या माहितीनुसार ते व त्यांची मावस बहीण सविता समाधान सुरडकर ह्या ३० सप्टेंबर च्या रात्री दहा वाजताच्या सुमारास दोघे दुचकीवर घरी जात असताना तहसील कार्यालय चौकात कौटुंबिक व शेतीच्या वादातून आरोपी समाधान सुरडकर यांनी बोलेरो कार मागून जोरात
चालवत आणून दोघांना जीवी मारण्याच्या उद्देशातून जबर धडक दिली. या धडकेमध्ये सविता समाधान सुरडकर या गंभीरित्या जखमी झाल्या होत्या.
तेव्हा त्यांना तात्काळ चिखली येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु जबर एवढी धडक होती की त्यांच्या डोक्याला व मेंदूला मार लागला होता त्यामुळे त्यांना संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचारादरम्यान सविता सुरडकर यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीसांनी आरोपी समाधान धनसिंग सुरडकर रा.बेराळा विरुद्ध ०७३३/२४ कलम १०९ भारतीय न्याय संहितानुसार १ ऑक्टोबर रोजीच अपघाताचा गुन्हा नोंद केला होता.पुढिल घटनेचा तपास पोलिस निरीक्षक संग्राम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मातोंडकर हे करीत आहेत.

Previous articleबुलढाणा : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल
Next articleपोटच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस ५ वर्ष कारावास बुलढाणा न्यायालयाचा निकाल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here