आशाताई बच्छाव
नाशिक प्रतिनिधी अँड विनया नागरे. जागृती फाऊंडेशन(नाशिक) आयोजित पितृपक्ष व नवरात्री विशेष अन्नदान दिनांक 28/09/2024 रोजी दिलासा केयर सेंटर (सिडको ) येथे पार पडले . या उपक्रमची संकल्पना जागृती फाउंडेशनच्या सांस्थापिका सौ ललिता रामदास नवघिरे व संस्थापक श्री प्रशांत भगवान शेळके यांच्या संकल्पनेतून मांडण्यात आली या उपक्रमाला ज्या ज्या महिला व पुरुष यांनी फुल न फुलाची पाकळी म्हणुन मदत केली अशा सर्वांचे मनापासून धन्यवाद.
कार्यक्रमाला वेळात वेळ काढून ज्या ज्या महिला हजर झाल्या अशा सर्वांचे जागृती फाऊंडेशन (नाशिक) च्या वतीने मनःपूर्वक आभार & धन्यवाद
जागृती फाऊंडेशन(नाशिक)
हिरवा रंग डोळ्यासाठी ही उत्तम आहे. हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते.
नयनांना शांतवून सुखावणारा. सृजनाचं, नवोन्मेशाचं, समृद्धीचं प्रतिक असणारा. एकाच वेळी शांतवणारा आणि चेतना जागवणारा, आयुष्याच्या अस्तित्वाचा रंग आहे हा हिरवा… निसर्गात सर्वाधिक आढळणारा…
हिरवा रंग म्हणजे निसर्गाचा रंग. म्हणूनच शांतता आणि संतुलितपणाचा संगम तुम्हाला यात पाहायला मिळेल. तसेच हा रंग निर्मितीचा, आरोग्याचा आणि सकारात्मक ऊर्जेचा आहे असं म्हटलं जातं. इतर कोणत्याही रंगापेक्षा या रंगाच्या विविध छटा आपल्याला पाहायला मिळतात. हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो. म्हणूनच घराच्या सजावटीत हिरव्या रंगांचा वापर जास्तीत जास्त करायला काही हरकत नाही. हिरव्या रंगाने घरात प्रसन्नता निर्माण होत असते.
अमेरिकेत हिरवा रंग समृद्धीचा मानला जातो. म्हणूनच की काय त्यांच्या डॉलरचा रंग हिरवा आहे. भारतामध्ये हा रंग शुभकार्याची सुरुवात व वृद्धीचे प्रतीक म्हणून वापरला जातो.