आशाताई बच्छाव
माहोरा येथील रेणुका माता मंदिर मध्ये घटस्थापना.
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके
दिनांक 04/10/2024.. सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यातील माहोरा येथे नवरात्र निमित्त रेणूका माता मंदिर येथे 04/10/2024 गुरूवार रोजी घटस्थापना करण्यात आली.घटस्थापना झाल्यानंतर दुर्गामातेची व रेणूका मातेची आरती घेण्यात आली. पहिल्या माळेपासून दररोज सकाळी 7.30 वाजता आणि सायंकाळी 8 वाजता आरती घेण्यात येते. अशी नऊ दिवस देवीची पूजा करून आरती घेण्यात येते. रेणुका माता नवसाला पावणारी माता म्हणून प्रचलित आहे.आरती साठी माहोरा व परिसरातून नागरिक मोठ्या प्रमाणत येतात. त्यामध्ये महीलांची संख्या लक्षणीय असते. नवरात्र होईपर्यंत मंदीर परिसरात दांडिया सारखे कार्यक्रम होत असतात. नवरात्र निमित्त रेणूका माता मंदिरावर मोठया प्रमाणात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. माहोरा परिसरातील सर्व समाज बांधव आरती साठी येतात.