Home जळगाव ज्येष्ठ हेचि श्रेष्ठ : रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगम व कवी कट्टा...

ज्येष्ठ हेचि श्रेष्ठ : रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगम व कवी कट्टा परिवार तर्फे ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान

21
0

आशाताई बच्छाव

1000807950.jpg

ज्येष्ठ हेचि श्रेष्ठ : रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी संगम व कवी कट्टा परिवार तर्फे ज्येष्ठ नागरिकांचा यथोचित सन्मान
*************************
चाळीसगाव, प्रतिनिधी विजय पाटील: रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटी -संगम ,मानस प्रोॲक्टिव्ह फिटनेस क्लब व कवी कट्टा परिवाराच्या वतीने १ ऑक्टोबर २०२४ रोजी ज्येष्ठ नागरिक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरीचे अध्यक्ष आधार महाले होते .याप्रसंगी विचार मंचावर रोटे रविंद्र शिरुडे, रोटरी एनक्लेव्ह चेअर पर्सन जळगाव ग्रामीण ,किरण चव्हाण , रोशनी चव्हाण ,डॉ.हरिश दवे व ॲड राहुल वाकलकर हे मान्यवर विचार मंचावर उपस्थित होते .यावेळी ज्येष्ठांच्या हितासाठी तीन व्याख्याने झाली त्यात किरण चव्हाण :- उतार वयातील आरोग्य व जीवन, डॉ .हरीश दवे: – आहार व जीवनशैली आणि ॲड राहुल वाकलकर :- ज्येष्ठांचे कायदे या विषयावर सुरेख मार्गदर्शन त्यांनी केले .कार्यक्रमाचे प्रास्तविक वैद्यकीय प्रतिनिधी उमेश पवार यांनी केले .
……………………………….
रोटरीचे कार्य शिवभावे जीव सेवा – असून त्याकडे समाजाने गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे . चेहऱ्याची सुंदरता आणि घराची उंची यावर जाऊ नका , घरातील वडीलधारी मंडळी हसतांना दिसली की समजा हे घर श्रीमंतांचे आहे.
…….रवींद्र शिरुडे ,रोटरी एन्क्लेव्ह चेअर पर्सन जळगाव ग्रामीण .
………………………………
या प्रोजेक्टची संकल्पना कवी रमेश पोतदार ,लालचंदजी बजाज व सुभाषजी करवा यांची होती .यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठांचा यथोचित सन्मान करण्यात आला यात प्रामुख्याने म .सो .बाविस्कर , अप्पा शेटे , डी एस मराठे , प्रा खुशाल कांबळे , आरती पूर्णपात्रे , प्रा . अशोक वाबळे , कवी शिवाजी साळुंखे , लेखक विश्वास देशपांडे , डॉ साधना निकम , प्रकाश चौधरी , सुभाष सराफ ,शिवाजी कुमावत , सुरेश पाटील ,हिरामण शिंदे , अभिमान झोडगे ,पंडितराव चव्हाण , श्रीकृष्ण राऊत, अरुण अमृतकर , अश्विनी ठेंगे ,पूजा जोशी, प्रा शामकांत निकम , प्रवीणसिंग सोळंकी, अशा एकूण ४० ज्येष्ठांचा स्मृतिचिन्ह व स्नेहपर्ण देऊन सत्कार करण्यात आला . कार्यामाचे सुत्रसंचलन व आभार पर्यावरण मित्र शालिग्राम निकम यांनी केले .कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वश्री रोटे सुधीरआबा पाटील , प्रकाश कुलकर्णी ,राजेंद्र छाजेड, ओमप्रकाश शर्मा , भालचंद्र दाभाडे ,अनमोल नानकर यांनी विशेष मोलाची भूमिका घेतली . एकंदरीत आगळा वेगळा कार्यकम जेष्ठांनी अनुभवला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here