Home जालना निवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या मागणीचा विचार करा: मनोज जरांगे

निवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या मागणीचा विचार करा: मनोज जरांगे

57
0

आशाताई बच्छाव

1000807936.jpg

निवडणुकीपूर्वी मराठ्यांच्या मागणीचा विचार करा: मनोज जरांगे
मराठ्यांना डावलण्याची चुक करु नका! असा इशाराही फडणवीसांना दिला.
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 03/10/2024
विधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वी मराठ्यांच्या मागण्यांचा विचार करा. नाहीतर फडणवीस यांच्या कारकिर्दीतील हि मोठी चूक ठरेल असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. फडणवीस यांना मी हिताचे सांगतोय मराठ्यांना डावलू नका, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, राज्यातील मराठ्यांची इच्छा होती की, दसरा मेळावा झाला पाहिजे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे. जेणेकरून दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. माझी तब्येत अजूनही बरी नाही परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. दसरा मेळाव्याला तुफान पोरं येणार आहेत. कधी दसरा येतो अशी आशा लागली आहे. असे त्यांनी म्हटले आहे. तसेच जनता, मुस्लिम बांधव, बारा बलुतेदार म्हणतात की, मी मुख्यमंत्री व्हावे. पण मी स्वार्थी नाही. माझ्यासाठी समाज मोठा आहे. असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे .यामुळे ते फक्त पाठीमागे राहून तरुणांना बळ देणार असल्याचे यावरून स्पष्ट दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here