Home जालना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी ई केवायसी करायला लावणे म्हणजे “राजा ला भिकारी...

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी ई केवायसी करायला लावणे म्हणजे “राजा ला भिकारी बनवणे.शेतकऱ्यांची थट्टा बंद करा व तात्काळ मदतीचे पैसे खात्यात जमा करा-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अभाभ्रनिसंस

39
0

आशाताई बच्छाव

1000792208.jpg

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी ई केवायसी करायला लावणे म्हणजे “राजा ला भिकारी बनवणे.शेतकऱ्यांची थट्टा बंद करा व तात्काळ मदतीचे पैसे खात्यात जमा करा-वसंतराव देशमुख राष्ट्रीय उपाध्यक्ष अभाभ्रनिसंस
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 28/ 09/2024
राज्यातील शेतकऱ्यांना कापूस,सोयाबीन ची असो की, रब्बी पीकांची नुकसान भरपाई ती शेतकरी जिवंत असो की मेलेला द्यायचीच आहे.सरकारने महसूल विभागासह साऱ्यांना कामाला लावले ई केवायसी करा , संमतीपत्र आणा, सगळ्या अटी पूर्ण झाल्या की,मग हळुवारपणे शेतकऱ्यांना सांगितले जाते की,नेट चा प्राॅब्लेम आहे उद्या या ही अशी वागणूक म्हणजे शेतकरी राजाची सरकार एक प्रकारची थट्टाच करत असल्याचा आरोप अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.वसंतराव देशमुख केला आहे.सरकार शेतकऱ्यांना भिक देत आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे. याला सर्वस्वी राज्यसरकार व सरकारी यंत्रणा जबाबदार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.शेतकऱ्यांच्या हक्काची मदत मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना एखाद्या याचका प्रमाणे शेतकऱ्यांना दोन -दोन दिवस मदतीच्या प्रतिक्षेत रांगेत उभे राहावे लागते काही शेतकरी शासनाच्या या चुकीच्या धोरणामुळे बळी ठरले आहेत याला जबाबदार कोण? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.हि शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक त्वरित थांबवावी आणि सरसकटपणे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावरू रक्कम जमा करावि शेतकऱ्यांची होत असलेली थट्टा बंद करावि असे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.
खर म्हणजे शेतीत नुकसान झाले म्हणून त्या बदल्यात नुकसान भरपाई म्हणून सानुग्रह अनुदान सरकारने दिले,त्यात शेतकरी जिवंत आहे की, मेलेला याचा प्रश्न येतोच कुठे ? ते काही शासकीय निवृत्ती वेतन नाही की, शेतकरी जिवंतच पाहिजे.त्याच्या बँकेतील खात्यात ते जमा करा चुकून १%मयत असतील तर त्याचे वारस जे शेतकरी आहेतच व ते देखील त्याच शेतीवर जीवन जगत आहेत त्यांचा उदरनिर्वाह करीत आहेत त्यांना ते मिळालेच पाहिजे तो त्यांचा जन्म सिद्ध हक्क आहे.
राज्यातील शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक त्वरित थांबवावी.शेतकरी रात्रंदिवस मेहनत करून शेती पीकवितो आणि सरकार आणि व्यापारी मिळुन शेतकऱ्यांना लुटून खात आहेत.सरकारने अनेक फुकट्या योजना आणून लोकांना कामचुकार व आळशी बनवले आहे.याचा सर्वात मोठा फटका राज्यासह देशातील शेतकऱ्यांना बसला आहे.या चुकीच्या धोरणाचा कुठेतरी विचार होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री वसंतराव देशमुख यांनी केले आहे

Previous articleजिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांचा सत्कार
Next articleजागे रहा, ड्रोन घेऊन चोर आलेत. रात्रीच्या वेळी ड्रोनच्या सहाय्यानं पाहणी करुन मध्यरात्री चोर येतील
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here