Home जालना जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांचा सत्कार

जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांचा सत्कार

73
0

आशाताई बच्छाव

1000792206.jpg

जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांचा सत्कार
प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 28/ 09/2024
जालना जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून संजय गाढवे यांची नियुक्ती झाल्यानंतर नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांचा सत्कार भोकरदनचे तालुका क्रीडा संयोजक कृष्णा पाटील जंजाळ यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह जालना येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा सत्कार केला.श्री संजय गाढवे हे याअगोदर भोकरदन येथे तालुका क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत होते.नुकतीच भोकरदनचे तालुका क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांची जालना जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून गुरुवारी त्यांनी अरविंद विद्यासागर यांच्याकडून पदभार स्वीकारला आहे .यावेळी भोकरदन तालुका क्रीडा संयोजक कृष्णा पाटील जंजाळ, कल्याण पाटील नवल, विजय पाटील, संतोष वाबळे आदींनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात जाऊन नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे साहेब यांचा यथोचित सत्कार करुन अभिनंदन केले.यावेळी आपण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खेळाविषयी आवड निर्माण होण्यासाठी व ग्रामीण भागात चांगले खेळाडू निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे साहेब यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here