Home जालना जाफाबाद भागातील जनतेने घेतली चोरांची धास्ती अशोक पाबळे

जाफाबाद भागातील जनतेने घेतली चोरांची धास्ती अशोक पाबळे

115
0

आशाताई बच्छाव

1000792204.jpg

जाफाबाद भागातील जनतेने घेतली चोरांची धास्ती अशोक पाबळे
तालुका प्रतिनिधी जाफराबाद-मुरलीधर डहाके
दिनांक 29/ 09/2024
जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी सह परिसरात मागील काही दिवसापासून चोरट्यांचा शिरकाव वाढल्याने ग्रामीण जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे चोरट्यांकडून काही ठिकाणी शेतात काम करणाऱ्या महिलांचे दागिने हिसकावूनण्याचा प्रकार घडल्याने ऐन सुगीच्या काळात महिला शेतात जाण्यास घाबरत आहे दरम्यान चोरी प्रकरणातील एका चोरट्याला पकडण्यात ज्या जाफाबाद पोलिसांना यश आले असलेले तरीही इतर काही चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले त्यानंतरही तुरीचे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे टेंभुर्णी परिसरातील बुटखेडा येथील रात्री तीन चार ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला त्यानंतर जाफाबाद तालुक्यातील कुंभारी या ठिकाणी एकाच रात्री दोन ठिकाणी एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी झाली याशिवाय शुक्रवारी दुपारी शेतात काम करणाऱ्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत घटना सुरूच असल्याने ग्रामीण भागातील गावागावात सध्या चोरट्यांचा चर्चा सुरू आहे महिला व मजुर वर्गात सध्या. भीतीचे वातावरण आहे सध्या सोयाबीन सोंगणी सुरु असताना चोरट्यांच्यां भीतीनेमुळे अनेक महिला शेतात जाण्यास घाबरत आहेत हे चोरटे दिवसा गावातील काहीतरी विकण्याच्या बाहाण्याने येऊन रेकी करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे यामूळे गावात येणाऱ्या अशा प्रत्येक नवख्या व्यक्तीवर गावकरी बारकाईने लक्ष ठेवून आहेत पोलिसांनी या चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा कशी मागणी जनतेतून होत आहे दरम्यान गावागावांत ग्रामसुरक्षा दल स्थापन करून सुरक्षिततेची काळजी घ्यावी असाही सुर निघत आहे.
【 चोकट 】 नागरिकांनी अफवा विश्वास ठेवू नये सध्या परिसरात चोरट्यांची चर्चा सुरू असल्यातरी नागरिकांनी न घाबरता दक्ष राहावे कोणी संशयित आढळल्यास त्वरित 112 वर या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क करावा केवळ संशयावरून कोणालाही मारहाण करू नये नवीन विक्रेते गावात असल्यास त्यांना आधार कार्ड व इतर माहिती मागून त्यांचे फोटो काढून ठेवावे पोलिसां तर्फे सर्व काळजी घेतली जात आहे ते मुरली पोलिसांच्या दोन गाड्या दररोज रात्री पेट्रोलिंग करीत आहे अनेक ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी पुढाकार घेत आहे नागरिकांनी अफेवर विश्वास ठेवू नये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ टेंभुर्णी

Previous articleमाहिती अधिकार प्रकरणात तत्‍परता आवश्‍यक – डॉ.हाटकर
Next articleजिल्हा क्रीडा अधिकारी संजय गाढवे यांचा सत्कार
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here