Home रायगड आझाद मैदानावर ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती पेन्शनधारकांचा १ ऑक्टो. रोजी लक्षवेधी आंदोलन

आझाद मैदानावर ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती पेन्शनधारकांचा १ ऑक्टो. रोजी लक्षवेधी आंदोलन

23
0

आशाताई बच्छाव

1000792125.jpg

आझाद मैदानावर ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समिती पेन्शनधारकांचा १ ऑक्टो. रोजी लक्षवेधी आंदोलन

युवा मराठा न्यूज रायगड ब्यूरो चीफ :- मुजाहीद मोमीन

मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता ईपीएस-९५ पेन्शनधारकांचे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ध्यानाकर्षण शांतीपूर्ण आंदोलन आझाद मैदान-मुंबई येथे होत असून सर्व ईपीएस-९५ पेन्शनधारक बंधु-भगिनींना यांनी आपल्या मागणीसाठी यात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

गेली आठ ते नऊ वर्षांपासून ईपीएस-९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या सक्षम नेतृत्वाखाली प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत पेन्शनरांच्या कल्याणासाठीच रात्रंदिवस लढा सुरू आहे. सर्व प्रकारच्या सर्व क्षेत्रांतील विविध आयुधांचा वापर करून विविध माध्यमांतून आजपर्यंत आंदोलनं केली तसेच तहह्यात आंदोलने चालू आहेत. यासाठी संबधीत भेटीगाठी, पत्रव्यवहार करूनही अद्याप फक्त आश्वासनांव्यतिरिक्त पदरात काहीच पडले नसल्याने आता विधानसभेची निवडणूक आचार संहिता लवकरच लागणार आहे. त्यामुळे विधानसभेची आचार संहिता लागण्यापूर्वी केंद्र सरकारकडून तातडीने ईपीएस-९५ पेन्शनधारकांच्या मागण्या मान्य कराव्यात यासाठीच १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक ११वाजता ईपीएस-९५ पेन्शनधारकांचे आझाद मैदान-मुंबई येथे शांतीपूर्ण ध्यानाकर्षण आंदोलन करण्याचे जाहीर करण्यांत आले आहे.

हे आंदोलन अखेरचे आंदोलन ठरण्यासाठी ईपीएस-९५ पेन्शनधारकांनी मोठ्या संख्येने सहभागी होणे आवश्यक आहे. तरी इपीएस् ९५ व ईपीएफओ क्षेत्रीय कार्यालयाशी सलग्न असलेल्या औद्योगिक, सहकारी संस्था, महामंडळ, सहकारी बँका, सहकारी उद्योगधंदे आणि खाजगी क्षेत्रातील आस्थापनेतून सेवानिवृत्त झालेल्या सर्व ईपीएस-९५ पेन्शनधारकांनी १ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठिक११ वाजता आझाद मैदान मुंबई येथे शांतीपूर्ण ध्यानाकर्षण आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने अध्यक्ष कमांडर राऊत यांनी केले आहे.

सदरच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होवून आपले बहुमुल्य योगदान देवून लढा यशस्वी होण्यासाठीच सिंहाचा वाटा उचलून मोलाची कामगिरी करावी. या क्षेत्रीय कार्यालयाशी आवर्जून सहभागी होवून लढा तीव्र करण्यास सहकार्य करावे. आता नाही तर कधीच नाही यासाठी अधिक सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष राऊत यांनी केले आहे.

Previous articleजैविक शेती मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रमात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग
Next articleसोनई महाविद्यालयातील प्रा. तुकाराम जाधव यांना पीएच.डी. पदवी प्रदान…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here