आशाताई बच्छाव
शेतकऱ्यांना हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज… कुलगुरु मा डॉ. इन्द्र मणि
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र व शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेचा १३ वा भाग यामध्ये हवामानातील बदल आणि शेती व्यवस्थापन या विषयावर दि.२४ सप्टेंबर रोजी परभणी विधापीठाचे कुलगुरु मा. श्री.प्रा.डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन कार्यशाळा संपन्न झाली या ठिकाणी प्रमुख वक्ते जेष्ठ हवामान तज्ञ शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती तर यावेळी हवामान संशोधन संचालक मा.डॉ. खिजर बेग यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. (प्रा.) डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, वातावरणातील हवामान बदलामुळे सर्वच क्षेत्रात कमालीची अनिश्चितता जाणवत आहे. याचा परिणाम कृषि क्षेत्रावर दूरगामी मोठा विपरीत परिणाम दिसून येत आहेत. यामुळे शेतीवरील पिकांच्या उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम होऊन उत्पादनात मोठी घट निर्माण होत आहे .हवामान बदलानुसार तंत्रज्ञान विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध व्यासपीठांवर विचार मंथन होत आहे. विद्यापीठानेही हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान विकसित करून नीक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले आहे. यामध्ये असलेले कोरडवाहू शेती तंत्रज्ञान जसे की, बीबीएफ़ लागवड पद्धत, आंतरपीक पद्धत, एकात्मिक शेती पद्धती, शेततळे तंत्रज्ञान, पोटाशियम नायट्रेटची फवारणी, विहीर पुनर्भरण, कुपनलिका पुनर्भरण, कमीत कमी संरक्षित सिंचन, सिंचनाच्या आधुनिक पद्धती, अधिक पावसात निचरा चर, बीबीएफ़ लागवड पद्धत, योग्य बि बियाणांचा वाणांचा वापर, पिक संरक्षण याचा अवलंब करावा. नवयुवकांनी शेती उद्योगात पुढाकार घेवून या नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन होत असलेली उत्पादनातील तूट भरून काढण्याची काळची गरज आहे.
श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली