आशाताई बच्छाव
पं. दीनदयाळ उपाध्याय व स्व. अण्णासाहेब पाटील यांची भाजपा जिल्हा कार्यालयात जयंती साजरी
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) – भारतीय जनसंघ पार्टीचे सह संस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय व स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती (आज २५) रोजी भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय जालना येथे साजरी करण्यात आली. यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय व स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांना अभिवादन करून प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी जालना विधानसभा प्रमुख भास्कर आबा दानवे, प्रदेश निमंत्रित सदस्य रामेश्वर भांदरगे, जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, जालना महानगराध्यक्ष अशोक आण्णा पांगारकर, प्रदेश निमंत्रित सदस्य राजेश राऊत, विजय कामड, विमलताई आगलावे, जिल्हा सरचिटणीस सिद्धिविनायक मुळे आदींची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी मार्गदर्शन करताना भास्कर आबा दानवे म्हणाले की, जनसंघाचे संस्थापक डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्या मृत्यूनंतर ज्यांनी जनसंघाची धुरा सांभाळली व समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीचा विचार करून अंत्योदयाची संकल्पना मांडली आणि त्याच मार्गावर आज सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मार्गदर्शनामुळे भारतीय जनता पक्ष तळागाळात पोचला त्या दीनदयाळ उपाध्याय यांना जयंती निमित्त शतशः नमन, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे संघटन कौशल्य अंगीकृत करून व दीनदयाळ यांचे जीवन चरित्र वाचून व आपल्या जीवनात दीनदयाळ यांचे विचार आचरणात आणल्यास त्यांचे जीवन आदर्श झाल्याशिवाय राहणार नाही.