Home वाशिम माऊंटआबु येथील राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनाकरिता कारंजा येथील पत्रकार बांधव रवाना

माऊंटआबु येथील राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनाकरिता कारंजा येथील पत्रकार बांधव रवाना

63
0

आशाताई बच्छाव

1000784509.jpg

माऊंटआबु येथील राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनाकरिता कारंजा येथील पत्रकार बांधव रवाना
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ- राजस्थान राज्यातील माऊंट आबु येथे प्रजापिता ब्रम्हकुमारी मिडीया विंगच्या वतीने २६ ते ३० सप्टेंबरपर्यत आयोजित केलेले पत्रकारांचे राष्ट्रीय महासंमेलन तथा सहविचार परिसंवादाकरीता कारंजा येथील प्रजापिता ब्रम्हकुमारी विश्वविद्यालय कारंजाच्या संचालिका ब्रम्हकुमारी मालतीदीदी यांच्या मार्गदर्शनात कारंजातील पत्रकार बांधव मंगळवार, २४ सप्टेंबर रोजी रवाना झाले.
स्वस्थ आणि सुखी समाजाच्या आध्यात्मिक सशक्तीकरणासाठी ब्रम्हाकुमारीज या सेवाभावी संस्थेच्या वतीने माऊंट आबू येथील आनंदसरोवर येथे दरवर्षी देशभरातील पत्रकारांसाठी मोफत राष्ट्रीय महासंमेलन घेण्यात येते. या पत्रकार महासंमेलनाला विद्यमान राष्ट्रपती ब्र.कु.द्रोपदी मुर्मू यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या कार्यक्रमाला संपूर्ण भारत देशामधून हजारो पत्रकार, संपादक, प्रकाशक, रेडीओ, दुरदर्शन, इलेक्ट्रॉनिक्स मिडीया संवाददाता सहभागी झाले आहेत. या संमेलनाकरीता जेष्ठ पत्रकार तथा मार्गदर्शक अशोकराव उपाध्ये गुरुजी यांच्या नेतृत्वात राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त जेष्ठ पत्रकार संजय कडोळे, पत्रकार लोमेश चौधरी, विजय खंडार, सुधाकर इंगोले, गजानन हरणे, संजय गावंडे, शंकरराव पुंड आदी पत्रकार बांधव रवाना झाले आहेत. या सर्व पत्रकारांना प्रदिप वानखडे, गोलू लाहे, नकुल उपाध्ये, योगेश उपाध्ये, दुष्यंत चौधरी आदींनी बडनेरा रेल्वे स्थानकावर त्यांना शुभेच्छा दिल्या.

Previous articleजिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleपं. दीनदयाळ उपाध्याय व स्व. अण्णासाहेब पाटील यांची भाजपा जिल्हा कार्यालयात जयंती साजरी
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here