Home वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद

50
0

आशाताई बच्छाव

1000784507.jpg

जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद
श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय, आधार बहूउद्देशिय संस्था व रासेयोचा संयुक्त उपक्रम
वाशिम, गोपाल तिवारी ब्युरो चीफ– रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हा उद्देश समोर ठेवून आधार बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था झाकलवाडी, श्री रामराव सरनाईक समाजकार्य महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार, २५ सप्टेंबर रोजी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजीत रक्तदान शिबीराला रक्तदात्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.
या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व झाकलवाडी येथील युवकांनी सहभाग घेवून उस्फूर्तपणे रक्तदान केले. शिबिरामध्ये महादेव काळबांडे, शुभम उबाळे, जाबीर शेख, देव डोंगरदिवे, सय्यद आयान, राहुल डोंगरदिवे, सय्यद नूर, विशाल कव्हर, गजानन खरात आदींनी रक्तदान करून समाजाला रक्तदानाचे महत्त्व समजावे व गरजेच्या वेळी ते उपयोगी यावे यासाठी रक्तदान करणे आवश्यक असून सर्वांनी रक्तदानाचे सर्वश्रेष्ठ दान करावे असा संदेश दिला. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे पदाधिकारी प्रा. डॉ. मनीषा कीर्तने व प्रा. डॉ. रवींद्र पवार तसेच आधार संस्थेचे पदाधिकारी सय्यद युनूस, सय्यद नूर, विशाल कव्हर, अनंत ढोले, श्रावणी राजणकर, शामल राजणकर, सिमा शृंगारे, शितल बुरके, दिक्षा तायडे, कार्तिका जामकर, जयश्री भडांगे उपस्थित होते. रक्त संकलनासाठी रक्तदान विभागामधील डॉ. स्नेहा भोबळे, डॉ. मुंडे, आशिष इंगळे, गणेश वैद्य व इतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले. शिबीराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, आधार बहुउद्देशीय अल्पसंख्यांक संस्था व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Previous articleनेवासा विधानसभा निवडणुकीत गडाख विरुद्ध गडाख होणार संघर्ष .
Next articleमाऊंटआबु येथील राष्ट्रीय पत्रकार महासंमेलनाकरिता कारंजा येथील पत्रकार बांधव रवाना
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here