आशाताई बच्छाव
जाफराबाद तालुक्यात तीन दिवसा पासून पावसाची संततधार
तालुका प्रतिनिधी जाफराबाद- मुरलीधर डहाके दिनांक.27/09/2024
सविस्तर वृत्त असे की, जाफराबाद तालुक्यात सलग तिन दिवस पावसाने हजेरी लावली.26 तारखेला दुपारीच एक वाजता पावसाला सुरुवात झाली. अक्षरशः पाऊस एवढा जोरात होता की जाफराबाद शहरातील रोडवर नदीचे स्वरूप आले होते.या अगोदर दोन दिवसा पासून मुसळधार पाऊस सुरू आहे.. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झाले आहे. वारा, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळत आहे. सोयाबीचे अतोनात नुकसान झाले आहे. तहसील कार्यालय शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यात असमर्थ ठरत आहे. असे तालूक्यातील शेतकरी बोलू लागले आहेत. कोणीही पंचनामे करण्यासाठी आलेले नाहीत असेही शेतकऱ्यांनी सांगीतले. तहसीलदार साहेबांनी वेळीच पंचनामे करून शेतकऱ्याना अर्थिक मदत करावी अशी मागणी जाफराबाद तालुक्यातील शेतकऱ्याकडून होत आहे.