Home बुलढाणा कानून के हाथ लंबे होते है, पण वरवंड गावात एका ते दोन...

कानून के हाथ लंबे होते है, पण वरवंड गावात एका ते दोन महिन्यापासून चोरांची धुमाकूळ सुरूच,पण चोरांना पकडण्यासाठी आता गावकऱ्यांनी पोलिसांना केलं अहवान….

22
0

आशाताई बच्छाव

1000778002.jpg

कानून के हाथ लंबे होते है, पण वरवंड गावात एका ते दोन महिन्यापासून चोरांची धुमाकूळ सुरूच,पण चोरांना पकडण्यासाठी आता गावकऱ्यांनी पोलिसांना केलं अहवान….
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :- बुलढाणा तालुक्यातील गेल्या काही दिवसापासून वरवंड गावात मध्ये चोरांनी चांगली धुमाकूळ घातली आहे. त्यातच गावात चालणारे अवैधं धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे पोलीस विभागाने काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज आता गावात पडत आहे. एकीकडे गावात विकास कामांची झंजावत असताना आता तर गावातच चोरांनची सुद्धा झंजावत दिसायला येत आहे एकेकाळी गावात चोरांना चोरी जर करायची म्हटलं तर भीती वाटत होती पण आता तर चक्क गावातील छोट्या मोठ्या चोऱ्या होत होत्या पण आता सर्रास मोठमोठ्या चोऱ्या सुद्धा होऊ लागल्या गेल्या काही दिवसात गावातीलच परसराम काळे यांच्या घरात चोरी झाली नंतर संतोष धंदर यांच्याही घरातून चोरांनी 34 हजार रुपयाची चोरी केली. नंतर आत्माराम जेऊघाले यांच्याही घरातून चोरांनी बारा हजार रुपये लंपास केले नंतर राजूभाऊ जेऊघाले यांच्या शेतात उडीद काढण्याचं काम चालू होतं संध्याकाळ झाली म्हणून मशीन शेतातच सोडलं पण सकाळी जाऊन पाहतातर चक्क सोयाबीन काढणार हार्वेस्टरच किंमत (दोन लाख)चोरानी चोरून नेलं
ही घटना घडुन एकच दिवस झालानाही तर भास्कर भाऊराव जेऊघाले यांच्या शेताततुन गोठ्यात लावलेली टू व्हीलर भर दिवसा चोरांनी चोरून नेली.त्यामुळे आता गावांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे. यामध्ये पोलीस विभाग कसून तपास करत आहे. मात्र चोर काही सापडत नाही त्यामुळे गावात मध्ये अजून पुढे चोरी होईल का? असा प्रश्न आता गावकऱ्यांना पडला आहे. त्यामुळे गावात रात्रीच्या वेळी आता जागरण करण्याची पाळी गावकऱ्यावर आली आहे.
गेल्या एक ते दोन वर्षा अगोदर सुद्धा वरवंड गावात मध्ये चोरय झालेल्या होत्या पण आजपर्यंत त्या चोरांचा शोध लागलेला नाही त्यामुळे पोलीस विभागाला का अपयश येतय असा प्रश्न सुद्धा गावकऱ्यांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here