आशाताई बच्छाव
———————————————–
मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन टेस्ट सिरीज चे वितरण
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 22/09/2024
जालना शहरातील जनता हायस्कूल येथे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या पुढाकाराने
इयत्ता दहावीच्या विविध शाळातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन टेस्ट सिरीज, स्मार्ट कार्डचे वितरण माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जनता हायस्कूल जालना, जिल्हा परिषद कन्या प्रशाला, डग्लस गर्ल्स हायस्कूल या शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते यावेळी बोलताना माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करावा व जीवनात आपले ध्येय गाठावे असे सांगत जीवनात प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो परंतु न डगमगता आपण आपल्या ध्येयाप्रती एकनिष्ठ राहून प्रामाणिक प्रयत्न केल्यास जीवनात यश हमखास मिळते असे यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून ऑनलाईन टेस्ट सिरीज, स्मार्ट कार्ड च्या माध्यमातून विविध विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा सराव करण्यास तुम्हाला सोयीस्कर होईल व त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेला होईल असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर अनुराग कपूर, यशराज खोतकर, देवेंद्र बुंदेले, मुख्याध्यापिका श्रीमती अनिता पवार, मुख्याध्यापक संजय भुजंग, जीवन जाधव, बाबासाहेब पवार, प्रभाकर सावंत, संतोष गंडाळ, विष्णू पवार, सुधीर वाघमारे, संदीप तोडावत, प्रतीक कांगणे ,श्रीमती जयश्री डोईफोडे, श्रीमती हिना कौसर, बाबासाहेब गीते, राजेंद्र देवडे यांची उपस्थिती होती सी एस आर निधीमधून लोकाभिमुख कामांचे नियोजन आणि अमलबजावणीसाठी महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री मा. श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष स्थापन करण्यात आले असून त्या माध्यमातून सामाजिक उत्तरदायित्व निधी मधून शालेय विद्यार्थ्यांना सदरील टेस्ट सिरीज वितरणाचा नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका श्रीमती अनिता पवार यांनी केले तर सूत्रसंचालन पवन जोशी यांनी केले तर उपस्थितांचे आभार संतोष गंडाळ यांनी मानले यावेळी शाळेच्या वतीने मान्यवरांचे शाल व पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले