आशाताई बच्छाव
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ जालना जिल्हा बंदला जाफ्राबादेत उस्फुर्त प्रतिसाद…
तालुका प्रतिनिधी जाफ्राबाद -मुरलीधर डहाके
दिनांक 22/09/2024
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती या बंदला जाफ्राबाद तालुक्यातील नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठान दुकाने बंद ठेवून उस्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
यावेळी मराठा आंदोलकांनी सरकारला इशारा दिला आहे की मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे गेल्या १३ महिन्यापासून आंदोलन करीत आहे आणि त्यांनी १३ महिन्यात पाच आमरण उपोषण केले आता सध्या त्यांचे सहावे आमरण उपोषण हे सुरू असून त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस आहे त्यांची त्यांची प्रकृती खालावली असून सरकार मात्र झोपेचे सोंग घेत आहे असा आरोप मराठा समाजाने केला आहे तरी राज्य सरकारने तात्काळ मराठा आरक्षण सदर्भातील
निर्णय घ्यावा सगे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे व मराठा समाजाचा हैदराबाद गॅझेट सातारा संस्थान गॅझेट बॉम्बे गॅझेट घेऊन महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट ओबीसीचे आरक्षण देऊन न्याय द्यावा व मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण मागे घ्यावे अशी मागणी यावेळी मराठा समाज बांधवांनी केली आहे…
यावेळी तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते ….