आशाताई बच्छाव
गरीब मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदापेक्षा मोठा आनंद नाही – आ.कैलास गोरंटयाल
—————————————-
जालना आयटीआय मधील १३ विद्यार्थ्याना मिळाली नौकरी @ जालना जनसेवा ग्रुप व आयएसआय ई इंडिया संस्थेच्या प्रयत्नांना यश
जालना (प्रतिनीधी दिलीप बोंडे) दसरा, दिवाळी सारखे सन आपल्यासह प्रत्येकांच्या जीवनातील आनंदाचा क्षण असतो. मात्र,नौकरी मिळाल्याने गरीब मुलांच्या चेहऱ्यावर दिसत असलेला आनंद यापेक्षा मोठा आनंद आपल्याला झाला असे भावोद्गार आ. कैलास गोरंटयाल यांनी येथे बोलतांना काढले.
जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असलेल्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी जालना जनसेवा ग्रुप आणि आयएसआय ई इंडिया या संस्थेच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिरातून २१ पैकी १३ विद्यार्थ्याना विविध नामांकित कंपन्यांमध्ये नौकरी मिळाल्याने त्यांचे कौतुक व प्रशस्तीपत्रांचे वाटप काल शुक्रवारी आ. कैलास गोरंटयाल यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी संस्थेच्या प्राचार्या श्रीमती रजनी एस. शेळके, जालना जनसेवा ग्रुपचे सचिव डॉ. रामनारायण जैस्वाल, सुदेश करवा आयएसआय ई इंडिया या संस्थेच्या झोनल मॅनेजर रुपाली अग्रवाल नरेश गुप्ता, सुनील राठी, संजय बाहेती, आयएसआय ई इंडिया या संस्थेचे प्रशिक्षक गणेश राजपूत यांची यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. आपल्या भाषणात आ.गोरंटयाल यांनी जालना जनसेवा ग्रुपच्या माध्यमातून सुरू असलेल्या कार्याची प्रशंसा करून गणपती उत्सव असो की दसरा, दिवाळी सारखे सन असो या सणांचा आनंद प्रत्येकांच्या चेहऱ्यांवर दिसून येतो.