Home जालना शहीद चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय पुरस्काराने! सामाजिक कार्यकर्ते पंडित तिडके यांचा गौरव !

शहीद चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय पुरस्काराने! सामाजिक कार्यकर्ते पंडित तिडके यांचा गौरव !

14
0

आशाताई बच्छाव

1000765944.jpg

शहीद चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय पुरस्काराने! सामाजिक कार्यकर्ते पंडित तिडके यांचा गौरव !
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख
दिनांक 20/09/2024

सविस्तर वृत्त असे की, अखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती ब्रिक्स ह्युमन राईट्स मिशनच्या वतीने आयोजित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सोहळा व १४ वे राष्ट्रीय अधिवेशन दिनांक १७/१८ सप्टेंबर रोजी प्रणव श्रीमंगल कार्यालय लातूर येथे संपन्न झाले या अधिवेशनामध्ये भारत देशामधिल पदाधिकारी उपस्थित होते!निजामाच्या गुलामगिरीतून मराठवाडा मुक्त करून मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून दिल त्या थोर वीर महापुरुषांना व वीर पत्नी, वीर मातां, वीर पिता, यांचा व त्यांच्या परिवारांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान व गौरव करण्यात आला या दिमागदार सोहळ्यामध्ये संपूर्ण देशामधून आलेल्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला २०२३/२० २४ या वर्षांमध्ये सर्वोत्कृष्ट कार्यकर्त्यांनी काम करीत असताना सामाजिक सलोखा जोपासून समाजकार्यासाठी सेवा करत असताना अमुल्य योगदान दिले त्याचबरोबर सर्व घटकातील महिलांना पिडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्याचे काम केलं त्या पदाधिकाऱ्यांचा शहीद चंद्रशेखर आझाद राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील रहिवासी असलेले सामाजिक कार्यकर्त पंडित तिडके यांनी संघटनेच्या माध्यमातून अनेक पिडित कुटुंबांना न्याय मिळवून दिला त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रशासकीय कार्यालयातील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडे करून अनेक अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची !शास्तीची कारवाई व दंड लावण्यास वरिष्ठांना भाग पाडले त्यामुळे यांच्या कार्याची दखल घेऊन संघटनेच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा यांच्या शिफारशीनुसार पंडित तिडके महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांना शहीद चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला त्यामुळे सर्व स्तरातून त्यांच अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे..? या दोन दिवस व राष्ट्रीय अधिवेशनास राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर बाबा, राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख ,राष्ट्रीय सरचिटणीस अमोलजी नानाजकर ,राष्ट्रीय सरचिटणीस राजू पाटील सिपांळकर, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबुराव क्षेत्र पाटील, प्रदेशाध्यक्षा अँड राणीताई स्वामी, प्रदेश अध्यक्ष पंडितराव तिडके, प्रदेश निवड कमिटी अध्यक्ष अनिल दादा देसले, प्रदेश अध्यक्ष सैनिक विभाग उल्हास दादा पाटील, प्रदेशाध्यक्षा युवती सनाताई, राष्ट्रीय समन्वयक हितेश दाभाडे यासह अनेक मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील तमाम पदाधिकाऱ्यांनी पंडित तिडके यांचे अभिनंदन केले. हिंगोली जिल्ह्यात सर्वत्र त्यांच्या कार्याच अभिनंदन होत आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना पंडित तिडके यांनी सांगितले की, मला मिळालेला शहीद चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय पुरस्कार हा माझ्या कार्याची पावती व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे मिळाला! मला मिळालेला पुरस्कार सर्व पदाधिकाऱ्यांना समर्पित करीत असल्याचे त्यांनी सांगितले

Previous articleप्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी चौधरी रविवारी जालना जिल्हाच्या दौऱ्यावर
Next articleशहीद चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय पुरस्काराने! सामाजिक कार्यकर्त्या वंदनाताई थिटे यांचा गौरव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here