Home जालना प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी चौधरी रविवारी जालना जिल्हाच्या दौऱ्यावर

प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी चौधरी रविवारी जालना जिल्हाच्या दौऱ्यावर

9
0

आशाताई बच्छाव

1000765932.jpg

प्रदेश काँग्रेसचे सहप्रभारी चौधरी रविवारी जालना जिल्हाच्या दौऱ्यावर
———————————————-
जालना (प्रतिनिधी दिलीप बोंडे) – जालना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा राज्याचे सहप्रभारी माननीय श्री कुणालजी चौधरी हे दि. 22 सप्टेंबर 2024 रविवार रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्ह्यातील विधानसभेच्या पूर्व तयारीसाठी मार्गदर्शन करणार आहेत. प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी नामदेवराव पवार यांच्या अध्यक्षते खाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह दिपक हास्पिटल समोर  जुना जालना येथे रविवार रोजी दुपारी 3 : 00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी खासदार डॉ. कल्याणराव काळे, आमदार कैलाश गोरंट्याल , आमदार राजेश राठोड,  माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया , समन्वयक डॉ. जितेंद्र देहाडे,  शेख फरीद , आर आर खडके , प्रदेश सरचिटणीस कल्याण दळे , एड. राम कुराडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत , या बैठकीला जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी सर्व तालुकाध्यक्ष सर्व आघाडीचे जिल्हा अध्यक्ष,  विविध सेलचे जिल्हाध्यक्ष,  माजी जि.प.प.स. , न.प. सदस्य आणि सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जालना जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ देशमुख , शहर जिल्हा काँगेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद  ,राजेंद्र राख,  वसंत जाधव , विजय चौधरी , गणेश राऊत , राम सावंत , वैभव उगले यांनी केले आहे.

Previous articleबस-आयशर भीषण अपघातात 6 प्रवाशी ठार;   जखमींना खासदार डॉ. कल्याण काळे यांनी दिली भेट 
Next articleशहीद चंद्रशेखर आजाद राष्ट्रीय पुरस्काराने! सामाजिक कार्यकर्ते पंडित तिडके यांचा गौरव !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here