Home भंडारा पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या...

पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बैठकीत निर्धार पत्रकारांची सुरक्षा महत्वाची -जिल्हाध्यक्ष अनिल राठोड

17
0

आशाताई बच्छाव

1000765826.jpg

पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या बैठकीत निर्धार

पत्रकारांची सुरक्षा महत्वाची -जिल्हाध्यक्ष अनिल राठोड

 

संजीव भांबोरे
भंडारा ( जिल्हा प्रतिनिधी)प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या उमरखेड तालुका कार्यकारिणीची नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी पत्रकारांची सुरक्षा सर्वात महत्वाची असल्याचे सांगितले. पत्रकारांचे न्याय- हक्क अबाधित राहिले पाहिजेत. यासाठीच ही बैठक उमरखेड येथील विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आली होती. पत्रकारांना त्यांच्या कामामध्ये स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा अधिकार असला पाहिजे. पत्रकार हे समाजातील महत्त्वाचे घटक आहेत कारण ते सत्य शोधण्याचे आणि लोकांना माहिती देण्याचे कार्य करतात याशिवाय सभेत अन्य विषयावर चर्चा करण्यात आली. पत्रकारांना सरकार, व्यापारी संस्था किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या दबावापासून स्वतंत्रपणे काम करता यावे, पत्रकारांना त्यांच्या कामामुळे धमकी, हिंसा किंवा अडचणींचा सामना करावा लागू नये, त्यांची शारीरिक आणि मानसिक सुरक्षा राखणे आवश्यक आहे, पत्रकारांना सार्वजनिक माहिती आणि घटनांबद्दल योग्य ती माहिती मिळवण्याचा आणि ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार असावा, पत्रकारांवर चुकीच्या कारणांमुळे कारवाई होणार नाही याची काळजी घेणे, ते त्यांच्या कामामध्ये कायद्याने संरक्षित असावेत, जर एखाद्या पत्रकारावर आरोप केले गेले असतील, तर त्यांना योग्य न्यायालयीन प्रक्रिया मिळावी आणि त्यांचे हक्क अबाधित राहावेत.
पत्रकारांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यावर हल्ला किंवा चुकीचे आरोप झाले तर त्यांना न्याय मिळवून देणे हे संघटनेचे काम असेल. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना पत्रकारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे प्रतिपादन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राठोड यांनी केले. यावेळी संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरिदास हीगोंलकर, मैनोदीन सौदागर, तालुका अध्यक्ष प्रेम कुमार भारती, उपाध्यक्ष शिवाजी देवसरकर, ज्ञानेश्वर राठोड, बाबा खान, पंकज गोरे, नागेश रातोळे, संजय जाधव, गजानन आजेगावकर, प्रविन कनवाळे, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश कांबळे, गजानन नावडे, रमजान शेख इरफान यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Previous articleआता आंबेडकरी जनताच एकत्रीकरण घडवून आणू शकते –चंद्रशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती
Next articleमनुवादी सरकार खाली खेचा:- प्रा श्याम मानव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here