Home भंडारा वयोश्रींसाठी ” प्रफुल्ल ” ठरतोय ‘देवदूत’ ग्रामीण भागातील वृध्दांचा आधार..! राज्यात ‘मुख्यमंत्री...

वयोश्रींसाठी ” प्रफुल्ल ” ठरतोय ‘देवदूत’ ग्रामीण भागातील वृध्दांचा आधार..! राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’

16
0

आशाताई बच्छाव

1000765796.jpg

वयोश्रींसाठी ” प्रफुल्ल ” ठरतोय ‘देवदूत’

ग्रामीण भागातील वृध्दांचा आधार..! राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’

 

संजीव भांबोरे
भंडारा(जिल्हा प्रतिनिधी)पवनी तालुक्यातीलवैनगंगा नदीच्या तीरावर कुशीत वसलेल्या

ग्रामीण भागात राहणाऱ्या वयोवृद्ध नागरीकांच्या दारात शासनाच्या विविध योजना मिळवून देण्यासाठी शिवनाळा येथील समाज सेवेचा ध्येयवादी असलेला प्रफुल्ल , ढेंगरे नामक युवक नागरिकांसाठी सरसावला आहे.

प्रफुल्ल या ध्येयवेड्याने सामाजिक क्षेत्रात उडी घेत शासनाने सुरु केलेल्या वयोवृद्धासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फार्म स्व खर्चातुन निःशुल्क भरून दिले आहे लाखनी तालुक्यातील रेंगेंपार / कोठा येथील मानव कल्याण वृध्दाश्रम मध्ये राहत असलेल्या वृध्द ज्येष्ठ नागरीकांना सदर योजने विषयी माहिती पटवुन देत मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फार्म भरून घेतले आहे त्यामुळे वयोवृद्ध नागरीकांच्या चेहऱ्यांवर आनंदाश्रु दाटुन येत आहेत. ‘प्रफुल्ल ने आपल्या स्व खर्चातुन तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या उत्थानासाठी, समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना मिळवुन देत असताना समाजसेवेचे व्रत सुरू केले आहे. वयोवृद्धांच्या थेट दारात जाऊन त्यांचे विविध योजनेचे फार्म भरून देत असता व त्यांना शासानाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्याचं ही प्रयत्न करतो. प्रफुल्ल ने गरजूंना प्राधान्य देऊन गावनिहाय घरोघरी भेटी देऊन त्यांचे अर्ज भरून देण्याचे निःशुल्क समाजोपयोगी काम सुरू केले आहे.
राज्यातील ६५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य

स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदी करण्याकरिता तसेच मनःस्वस्थ तथा योगोपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यात येत आहे. त्यानुरूप लाभार्थी घटकात मोडणाऱ्या वृद्धांना ऑफलाईन अर्ज भरणे, त्या विषयी माहिती लागणाऱ्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून स्व खर्चातुन वयोवृद्धांचा फार्म भरणारा शिवनाळा येथील ध्येयवेडा युवक प्रफुल्ल ढेंगरे हा सामाजिक बांधिलकी जोपासत असल्याचे दिसत आहे.

Previous articleमुक्रमाबाद येथील छत्रपती संभाजी विध्यालयाचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश.
Next articleआता आंबेडकरी जनताच एकत्रीकरण घडवून आणू शकते –चंद्रशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here