Home जालना वालसावंगीत अचानक लागलेल्या आगीत तीन दुकानाचे नुकसान

वालसावंगीत अचानक लागलेल्या आगीत तीन दुकानाचे नुकसान

23
0

आशाताई बच्छाव

1000738783.jpg

वालसावंगीत अचानक लागलेल्या आगीत तीन दुकानाचे नुकसान

पोलीस प्रशासनाने व अग्निशमन दल व गावकऱ्यांच्या मदतीने जीवावर बेतून विझवली आग

तालुका प्रतिनिधी जाफराबाद :- मुरलीधर डहाके दिनांक 13/09/2024

भोकरदन तालुक्यातील वालसावंगी येथील जुन्या बस स्थानक परिसरात अचानक लागलेल्या आगीत तीन दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले. फकीरा सिरसाठ येथील व्यापारी यांच्या दूध डेरी भुसार व बब्बू बागवान यांच्या फ्रूट दुकानाला आग लागून दुकानातील फळाचे व बाहेर मोकळ्या जागेत ठेवलेल्या कॅरेट व पत्राचे सेड जळून खाक झाले असून शेजारील नामदेव नेवरे यांच्या घराला आग लागून संसार उपयोगी साहित्य कलर, टीव्ही, कुलर, फ्रिज यासह घरातील रोख रक्कम हॉटेलचे नुकसान झाल्याने घरात असलेली दुचाकी जळून खाक झाली यात अंदाजे सर्व नुकसानातीत 20 ते 25 रक्कम लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. यात बुधवारी झालेल्या रात्री अकरा वाजेच्या दरम्यान आग लागलेल्या आगीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला होता. या आगीत बरेचसे नुकसान झाल्याचे दिसून आले. आगीचा पेट एवढा भयंकर होता की नागरिकांना आग विझविण्यासाठी पोलिसांना प्रशासन व अग्निशमक दलाने आपला जीवावर बेतून कठीण प्रसंगात आग विझवली. यासाठी गावातील लोकप्रतिनिधी सुद्धा गावातील फोन द्वारे महावितरणला माहिती देऊन गावातील वीज तातडीने बंद करण्यासाठी सहकार्य केले. त्यामुळे काही अनर्थ टळला जर पोलिस प्रशासनाने केलेल्या मदत ही सर्वात मोठी ठरली.यावेळी पारध पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष माने, यांनी तातडीने आपल्या पोलीस पथकासह सतर्क होवून आगीदरम्यान जमलेल्या गर्दीला आगीपासून अंतरावर थांबण्यास सांगितले कुठल्या प्रकारे धोका होऊ नये त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन पोलीस व्हॅन मधून वेळोवेळी करीत होते यावेळी सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने, बीट जमादार प्रकाश सिनकर, संतोष जाधव, भगवान जाधव, सुनिल जाधव, होमगार्ड गाढवे यांच्यासह अग्निशामक दलाचे भोकरदन,तलाठी जाधव महसूल विभाग तसेच राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व गावकऱ्यांनी मदत करून सहकार्य केले.

Previous articleजि.प.केंद्रिय शाळेच्या वतीने अ.भा.भ्र.नि.सं.समीतीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव देशमुख यांचा सत्कार
Next articleअजिंठा येथे मराठवाडा ग्रामीण विकास संस्था लिंक वर्कर प्रकल्प अंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here