Home जालना ..तर याच शैक्षणिक वर्षापासून मेडिकल कॉलेज सुरू होईल – आ.कैलास गोरंटयाल

..तर याच शैक्षणिक वर्षापासून मेडिकल कॉलेज सुरू होईल – आ.कैलास गोरंटयाल

16
0

आशाताई बच्छाव

1000733518.jpg

….तर याच शैक्षणिक वर्षापासून मेडिकल कॉलेज सुरू होईल – आ.कैलास गोरंटयाल                        जालना (प्रतिनीधी दिलीप बोंडे) जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापकांची पदे तातडीने भरावीत यासाठी शासनस्तरावर प्रयत्न सुरू आहे. शासनाने सदर पदे भरल्यास याच शैक्षणिक वर्षापासून सदर कॉलेज सुरू होईल असा विश्वास आ. कैलास गोरंटयाल यांनी व्यक्त केला आहे.
जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरी पासून त्यासाठी जागा निश्चिती आणि अन्य सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी आ. कैलास गोरंटयाल यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून विधिमंडळाच्या पावसाळी, हिवाळी व अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील या प्रश्नावरून सभागृहात टोकाचा संघर्ष करत जालन्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. राज्य सरकारने त्यांच्या या संघर्षाची दखल घेत जालन्यातील मंजूर करण्यात आलेल्या या महाविद्यालयाच्या इमारत बांधकामासह वसतिगृह आणि अन्य बाबींसाठी तब्बल ४०४ कोटी रुपयांचा निधी देखील मागील काही महिन्यांपूर्वी मंजूर करून त्याची तरतूद केली आहे.  मात्र, पद भरतीची प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे जालन्यासह राज्यातील ११ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पदभरती करण्यासाठी केंद्रीय आरोग्य पथकाकडून दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. दि. २४ जून २०२४ रोजी दिल्ली येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जालना येथे आले होते. या पथकाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी निश्चित करण्यात आलेली जागा व अन्य बाबींची तपासणी करून त्यात काही त्रुटी काढल्या होत्या. मात्र सदर त्रुटींची पूर्तता करून त्याबाबतचा अहवाल मेडिकल कौन्सिलकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगून आ.गोरंटयाल म्हणाले .

Previous articleजोडरस्त्यासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
Next articleजालना गणेश महासंघातर्फे आयोजित अथर्वशीर्ष पठणास महिलांचा प्रतिसाद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here