Home बुलढाणा डॉक्टरच्या घरात धाडसी चोरी..! -दागिन्यांसह 75 हजारांचा मुद्देमाल लंपास ! – पोलिसांना...

डॉक्टरच्या घरात धाडसी चोरी..! -दागिन्यांसह 75 हजारांचा मुद्देमाल लंपास ! – पोलिसांना चोरट्याची आव्हान!

16
0

आशाताई बच्छाव

1000733511.jpg

डॉक्टरच्या घरात धाडसी चोरी..! -दागिन्यांसह 75 हजारांचा मुद्देमाल लंपास ! – पोलिसांना चोरट्याची आव्हान!
युवा मराठा न्यूज बुलडाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
बुलढाणा :-मलकापूर वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या डॉक्टरांच्या घरात धाडसी चोरी झाल्याची घटना मलकापूर पासून जवळच असलेल्या वाकोडी शिवारातील संग्राम हॉटेल समोरील पूर्वा नगर मध्ये दुपारी घडली. या घटनेत दाग दागिने व रोख रक्कमेसेह एकूण 75 हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लंपास केला.
प्रणव रामचंद्र चोपडे वय 26 रा. वाकोडी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ते पूर्वा नगर मध्ये आई सह वास्तव्यास आहेत. त्यांचे मलकापुरात डेंटल हॉस्पिटल आहे. नेहमीप्रमाणे रोज ते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या आईचा फोन आला, त्यांनी
सांगितले की मी बँकेच्या कामानिमित्त स्टेट बँक मध्ये आली होती. बँकेचे कामे करून घरी आली असता त्यांना घराचा लॉक तुटलेला दिसला. फिर्यादी यांनी घरी येऊन पाहणी केली असता घरात ठेवलेली रोख रक्कम व दाग दागिने असा एकूण 75000 हजाराचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केल्याचे दिसून आले. दिवसाच्या उजेडात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरडे पोलिसांना आव्हान देत असून पोलिसांचा भाग संपला की काय असा प्रश्न चर्चिला जात आहे. याप्रकरणी प्रणव चोपडे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Previous articleबस चालक व कंडक्टरने दुचाकीस्वाराला चोपले! काय आहे कारण? – चालक व कंडक्टर विरुद्ध गुन्हा दाखल
Next articleजोडरस्त्यासाठी शेतकऱ्यांचा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन 
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here