Home नाशिक नांदगाव मतदार संघातून राजेंद्र पाटील राऊत राष्ट्रीय मराठा पार्टी कडून उमेदवारी करणार

नांदगाव मतदार संघातून राजेंद्र पाटील राऊत राष्ट्रीय मराठा पार्टी कडून उमेदवारी करणार

207
0

Yuva maratha news

1000686680.jpg

नांदगाव मतदार संघातून राजेंद्र पाटील राऊत राष्ट्रीय मराठा पार्टी कडून उमेदवारी करणार
(प्रविण क्षीरसागर प्रतिनिधी)
मालेगाव,दि.२७: आगामी विधानसभा निवडणुकीत कौळाणे (नि) येथील रहिवासी आश्रयआशा फाऊंडेशन संस्थेचे संस्थापक तथा युवा मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि युवा मराठा न्यूजपेपर्स अँन्ड वेब न्यूज चॅनलचे मुख्य संपादक राजेंद्र पाटील राऊत हे नांदगाव मतदार संघातून राष्ट्रीय मराठा पार्टी कडून उमेदवारी करणार आहेत.
राजेंद्र पाटील राऊत यांचे कार्य संपूर्ण नांदगाव व मालेगाव तालुक्यातील जनसामान्यांना जवळून ज्ञात आहे.गोरगरीबांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी अधिकारी व शासन दरबारी प्रखर आवाज उठवलेला आहे.नांदगाव मतदार संघाचा भौगोलिक अभ्यास करता हा मतदारसंघ वर्षानूवर्षापासून विकासापासून कोसो दूर असून, राजेंद्र पाटील राऊत यांचा या मतदारसंघातील प्रत्येक गावात व वाडी वस्तीवर दांडगा जनसंपर्क आहे.त्याशिवाय राजेंद्र पाटील राऊत यांनी आजवर अनेक आंदोलने करून जनसामान्यांच्या हितासाठी लढा दिलेला आहे.या निवडणुकीत आपण धनशक्ती विरुद्ध सर्वसामान्य जनशक्तीचा आशिर्वाद घेऊन निवडणूक लढविणार असल्याचे राजेंद्र पाटील राऊत यांनी प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. स्वत ला राहायला घर नाही, कुठलीही धनसंपत्ती नाही.किंवा बँक बॅलन्स नाही अशा सर्वसाधारण कुटुंबातील असलेले राजेंद्र पाटील राऊत यांनी आजवर केलेल्या सामाजिक कार्याच्या जोरावर ही उमेदवारी करणार आहेत.तर नांदगाव मतदार संघातील विविध गावांमध्ये असलेला त्यांचा जनसंपर्क हा या निवडणुकीत मोलाचा व महत्वपूर्ण मुद्दा ठरु शकतो,असा अनुमान राजकीय विश्लेषकांनी नोंदविला आहे.

Previous articleबीड जिल्ह्याच्या कायद्यात राजकारण का? राजकारणात कायदा सुचेना!
Next article“लाडक्या बहिणी” रात्री तीन वाजेपासून बँकेच्या दारात..! मालेगावातील प्रकार…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here