Home जालना शिर्डी येथे मोफत कुत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिर

शिर्डी येथे मोफत कुत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिर

25
0

आशाताई बच्छाव

1000682424.jpg

शिर्डी येथे मोफत कुत्रिम पायरोपण (जयपूर फूट) शिबिर
दैनिक युवा मराठा प्रतिनिधी जाफराबाद – मुरलीधर डहाके.
दिनांक 26/08/2024.. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी व श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई) जयपुर यांचे संयुक्त विद्यमाने ०५ वर्षानंतर पुन्हा एकदा मोफत कृत्रीम पायरोपन (जयपुर फुट) शिबीर व गरजु दिव्यांगासाठी साहित्य वाटप दिनांक दि.२६/०९/२०२४ ते दि.३०/०९/२०२४ या दरम्यान करणेत येणार आहे. सदर शिबीरामध्ये गरजु व लाभार्थी दिव्यांग व्यक्तींची तपासणी करणेत येऊन आवश्यकतेनुसार दिव्यांग व्यक्तीच्या पायाचे माप घेऊन त्या मापाचे कृत्रीम पाय रोपन करण्यात येणार आहे. नवीन पाय बसविणे बरोबर जुन्या कृत्रीम पायाची दुरुस्ती देखील सदर शिबीरामध्ये मोफत करण्यात येईल. याचबरोबर दिव्यांगाकरीता आवश्यक साहित्याचे वाटप देखील शिबीर कालावधीत करण्यात येणार आहे. सदर शिबीरात येणा-या सर्व शिबीरार्थींना श्री. साईबाबा संस्थान मार्फत राहण्याची व दोन वेळच्या जेवनाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे.
तरी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तीनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा गोरक्ष गाडीलकर साहेब यांनी केले आहे.

शिबीरासाठी येताना सोबत आधार कार्ड किंवा सरकारी अन्य ओळखपत्र आणि ०२ पासपोर्ट साईज फोटो घेवुन यावे.

नावनोंदणी करीता खालील ठिकाणी संपर्क साधावा.
• श्री. साईनाथ रुग्णालय शिर्डी-०२४२३-२५८५५५

• शिबीर स्थळ – श्री साईनाथ रुग्णालय, २०० रुम शिर्डी.

Previous articleचतुर्थ सोमवार निमित्त संगमेश्वर महादेव दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी
Next articleगनिमी कावा करत शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना दाखविले काळे झेंडे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here