Home उतर महाराष्ट्र श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपाईला न दिल्यास प्रत्येक मतदारसंघात आमची ताकद दाखवून देऊ...

श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपाईला न दिल्यास प्रत्येक मतदारसंघात आमची ताकद दाखवून देऊ विजयराव वाघचौरे         

19
0

आशाताई बच्छाव

1000682371.jpg

श्रीरामपूर विधानसभेची जागा रिपाईला न दिल्यास प्रत्येक मतदारसंघात आमची ताकद दाखवून देऊ विजयराव वाघचौरे                                              श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर नगर जिल्ह्याची आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्वपूर्ण बैठक रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता शासकीय विश्रामगृह श्रीरामपूर येथे राज्य उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे, यांच्या अध्यक्षतेखाली तसेच जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात राज्याचे नेते राजाभाऊ कापसे उत्तर महाराष्ट्र सचिव ,दिपकराव गायकवाड विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली
त्यावेळी राज्य उपाध्यक्ष विजय वाघचौरे म्हणाले की रिपब्लिकन पक्षाला भाजप मित्रपक्षाने १२ जागा द्याव्यात असे रिपब्लिकन पक्षाची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भाजप नेत्यांकडे केली आहे त्यात सर्वप्रथम श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाची जागा ही रिपब्लिकन पक्षाला सोडवावी अशी आग्रही मागणी त्यांनी केली जर आम्हाला श्रीरामपूर विधानसभेची जागा सोडली नाही तर नगर जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात आम्हाला पर्याय खुले असून प्रत्येक मतदारसंघात रिपाई चा उमेदवार उभे करून आमची ताकद दाखवून देऊ तसेच रिपाईचा जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव म्हणाले की रिपब्लिकन पक्षाला आता मान्यता मिळाली असून पक्षाला उसावाला शेतकरी हे चिन्ह मिळाले आहे पक्षाच्या सभासद नोंदणी करून पक्षाचे पालन करावे जोपर्यंत पक्षाचा आदेश येत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ नये गेल्यास त्याची हकालपट्टी करण्यात येईल असे ही भालेराव म्हणाले; पक्षाच्या पदाधिकाऱ्याने सभासद नोंदणी करून पक्ष शिस्तीचे पालन करावे जोपर्यंत पक्षाचा आदेश येत नाही तोपर्यंत पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्याने कुठल्याही दुसऱ्या अक्षय स्टेजवर जाऊ नये अन्यथा हकालपट्टी करण्यात येईल असेही भालेराव शेवटी म्हणाले राजाभाऊ कापसे म्हणाले की आतापासूनच श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा प्रत्येक गावात जाऊन बूथ कमिट्या तयार करून आपले किती मतदान आहे याचा अहवाल तयार करावा दीपक गायकवाड म्हणाले की एक तारखेपासून जिल्हाभर एका दिवसात दोन तालुक्यात बैठका घेऊन विधानसभेची रणनीती आखण्याची सूचना सर्वांना मते मान्य केली जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात म्हणाले की आपल्याला श्रीरामपूर विधानसभेसाठी जागा मागणी जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा वेळ घेऊन त्यांना शिष्ट मंडळ भेटण्याचे ठरवण्यात आले ते सर्वानुमते मान्य करण्यात आले युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे म्हणाले श्रीरामपूर विधानसभेची जागा पक्ष ज्या कार्यकर्त्याला देईल त्याचं सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व तालुकाध्यक्षांनी तन-मनदानाने काम करून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी श्रीरामपूर शहराध्यक्ष विजय पवार कोपरगाव तालुका अध्यक्ष अनिल नन्नवरे, अकोला तालुका अध्यक्ष राजू गवांदे, राहता तालुका अध्यक्ष धनु भाऊ निकाळे व करण कोळगे, नेवासा तालुकाध्यक्ष सुशील धायजे, मनोज काळे राजू नाना गायकवाड,सुरेश जगताप,राजू भाऊ मगर,संजय , बोरगे मोहन आव्हाड सलीम शेख विकी कापसे गोविंद दिवे महिला आघाडीच्या रमाताई धीवर स्नेहलताई सांगळे सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष सुनील शिरसाठ यांनी केले तर आभार जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी मानले

Previous articleसाक्री तालुक्यातील पिंपळनेर येथे कधी येणार प्रशासनाला जाग
Next articleरिपब्लिकन युवा सेनेच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी इम्रान पटेल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here