Home रायगड Badlapur School Case : ‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण...

Badlapur School Case : ‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण – प्रवीण दरेकर

31
0

आशाताई बच्छाव

1000675610.jpg

Badlapur School Case : ‘लाडकी बहीण योजना’ बंद पाडण्यासाठी बदलापूर घटनेचे राजकारण – प्रवीण दरेकर

युवा मराठा न्यूज अलिबाग तालुका :- संभाजी म्हात्रे

राज्यातील महायुती सरकारने चालू केलेल्या महत्त्वकांशी लाडकी बहीण योजना बंद पाडण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर घटनेचे राजकारण करून अशांतता निर्माण करण्याचा महाविकास आघाडीच्या खेळीला नागरिकांनी बळी पडू नये असे आवाहन विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी महाड येथे केले आहे.

लाडकी बहिण योजनेला उदंड प्रतिसाद प्रवीण दरेकर यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ” महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी लाडकी बहीण योजनेला मिळत असलेल्या प्रचंड प्रतिसाद आला पाहून बदलापूर घटनेचे राजकारण सुरू केलं. बदलापूरच्या घटनेवरून राज्यात हिंसाचार मागून अशांतता निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र बंदचे आवाहन केलं. मात्र, न्यायालयाने चपराक दिल्यानंतर महाविकास आघाडीने आजचा बंद मागे घेतला. कोलकत्ता येथील महिला डॉक्टर वर झालेल्या अत्याचाराच्या उद्धव ठाकरे गट काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने साधा निषेध केला नाही”.

बदलापूर येथील घटना दुर्दैवी

प्रवीण दरेकर पुढे म्हणाले की, “बदलापूर येथील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेतील आरोपींना कठोर शासन व्हावे यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे बदलापूर घटनेतील आरोपीला तातडीने अटक ही करण्यात आली आहे. तसेच या घटनेत निष्काळजीपणा दाखविणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ देखील करण्यात आले आहे”.

मविआकडून लाडकी बहिण योजना बंद करण्याचा प्रयत्न

राज्यातील महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेचा चालू केलेल्या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद पाहून महाविकास आघाडीचे नेते दस्तावले आहेत. काहीही करून लाडकी बहीण योजना बंद पाडण्याचे प्रयत्न उद्धव ठाकरे काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून होत आहेत. बदलापूर येथे झालेल्या निदर्शनावेळी आंदोलकांकडून लाडकी बहीण योजनेचे पोस्टर झळकवण्यात येत होते. सामान्य नागरिकांकडून असे प्रकार केले जात नाहीत. आंदोलनामध्ये घुसलेल्या राजकीय शक्तींनी लाडकी बहीण योजनेचे पोस्टर झळकावले होते. असा आरोप प्रवीण दरेकरांनी केला आहे.

दरम्यान, आज महाविकास आघाडीकडून राज्यभरात बदलापूर घटनेचा निषेध करण्यात आला आहे.

Previous articleअलिबागमध्ये बेकायदा कॉल सेंटरचा पर्दाफाश, पोलिसांच्या कारवाईत ३५ जणांना अटक
Next articleनाशिकच्या भगूरमध्ये मुंजाबाबा देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here