Home बुलढाणा ब्रेकिंग ! दहशत पेराल तर दहशतच उगवेल !! आमदार श्वेता महाले उदयनगर...

ब्रेकिंग ! दहशत पेराल तर दहशतच उगवेल !! आमदार श्वेता महाले उदयनगर मध्ये आणखी एक “मनोज जरांगे” उदयास येताना पाहतील… राहुल बोन्द्रे

29
0

आशाताई बच्छाव

1000670734.jpg

ब्रेकिंग ! दहशत पेराल तर दहशतच उगवेल !! आमदार श्वेता महाले उदयनगर मध्ये आणखी एक “मनोज जरांगे” उदयास येताना पाहतील… राहुल बोन्द्रे
युवा मराठा न्यूज बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ संजय पन्हाळकर
चिखली :- बुलडाणा चिखली उदयनगर येथील युवा सरपंच मनोज लाहुडकर यांना रक्षाबंधनाच्या दिवशी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून नोटीस बजावण्यात आली होती, सदर नोटीस मध्ये उदयनगरचे युवा सरपंच मनोज लाहुडकर यांना बुलढाणा, जळगाव, अकोला, वाशीम व जालना या पाच जिल्ह्यातून तडीपार करण्याची शिफारस का करण्यात येऊ नये? यासंबंधी विचारणा करण्यात आली होती.
कायदा व सुववस्था, सार्वजनिक शांतता व लोकांच्या जीवित व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारची ती नोटीस मनोज लाहुडकर यांना मिळाली. सदर नोटीस संदर्भात कायदेशीर पद्धतीने जे उत्तर द्यावयाचे होते ते उत्तर मनोज लाहुडकर हे उपविभागीय दंडाधिकारी यांना सादर करणार आहेतच. परंतु या नोटीस मधून बरेच प्रश्न उद्भवतात आणी सत्ताधारी पक्षाच्या आमदार असणाऱ्या श्वेता महाले व त्यांचे पती जे गृहमंत्री यांचे स्वीय सहाय्यक आहेत ते विध्याधर महाले यांचा सरळ हस्तक्षेप या प्रकरणी दिसून येत आहे! असा आरोप माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी केला आहे.
कायदा व सुववस्था, सार्वजनिक शांतता व लोकांच्या जीवित व मालमत्तेस धोका निर्माण झाला आहे. अशा प्रकारची ती नोटीस मनोज लाहुडकर यांना मिळाली. सदर नोटीस संदर्भात कायदेशीर पद्धतीने जे उत्तर द्यावयाचे होते ते उत्तर मनोज लाहुडकर हे उपविभागीय दंडाधिकारी यांना सादर करणार आहेतच. परंतु या नोटीस मधून बरेच प्रश्न उद्भवतात आणी सत्ताधारी पक्षाच्या आमदार असणाऱ्या श्वेता महाले व त्यांचे पती जे गृहमंत्री यांचे स्वीय सहाय्यक आहेत ते विध्याधर महाले यांचा सरळ हस्तक्षेप या प्रकरणी दिसून येत आहे! असा आरोप माजी आमदार व जिल्हा काँग्रेस कमेटी अध्यक्ष राहुल बोन्द्रे यांनी केला आहे.
श्वेता महाले यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द उदयनगर जिल्हा परिषद मतदारसंघातून, जिल्हा परिषदेमध्ये सदस्य म्हणून निवडून येऊन सुरु केली होती. पुढे उदयनगर सर्कलनेच त्यांना आमदार बनवले. परंतु त्यांची अकार्यक्षमता बघून उदयनगर परिसरातील लोकांचा त्यांच्यावरील विश्वास कमी होत गेला, व त्यानंतर उदयनगर येथील जनतेतून सरपंच निवडण्याच्या निवडणुकीमध्ये आमदार व त्यांचे पती यांनी साम, दाम, दंड, भेद असे सर्व हातखंडे वापरूनही मनोज लाहुडकर त्यांना घाबरले नाहीत व सरपंच पदाच्या निवडणुकीत मनोज लाहुडकर पंधराशे पेक्षा जास्त मतांनी निवडून आले. आपल्या हक्काच्य
जास्त मताना निवडून आल. मतदारसंघातून दुसऱ्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून येताना बघून आमदार श्वेता महाले यांना प्रचंड यातना झाल्या असतील. त्यामुळे “ज्याचे काम खराब करता येत नाही त्याचे नाव खराब करावे” या उक्तीनुसार आमदार महाले यांनी बदल्याचे व दहशतीचे राजकारण सुरू केले. आणि त्याचाच एक भाग म्हणजे मनोज लाहुडकर या 29 वर्षाच्या युवा सरपंचाला पाठवलेली तडीपार करण्याची धमकी ची नोटीस असा आरोपच राहुल बोन्द्रे यांनी केला.
पुढे बोलताना राहुल बोंद्रे म्हणाले की, खरंतर या नोटीस पाठवून दहशत पसरवण्याच्या कृत्यातून आमदार श्वेता महाले यांची पराभूत मानसिकता
दिसते, परंतु या दहशतीच्या राजकारणातूनच केंद्रस्तरावर कन्हैया कुमार व राज्यस्तरावर मनोज जरांगे पाटील असे नेतृत्व उभे झाले, असाच “आणखी एक मनोज जरांगे पाटील उदयनगर मधून मनोज लाहुडकर या नावाने उदयास येईल व याचे सगळे श्रेय आमदार श्वेता महाले यांच्या दहशती राजकारणास राहील, सत्ता जाण्याच्या भीतीने आमदार महाले यांनी सत्तेचा जो दुरुपयोग सुरू केला आहे त्याचा आता काहीही फायदा होणार नाही अशा या नाजूक वेळी मनोज लाहुडकर व त्यांच्या कुटुंबासोबत महाविकास आघाडीतील सर्व घटकपक्ष एक दिलाने एक माणूस म्हणून उभे आहेत, असेही माजी आमदार राहुल बोंद्रे म्हणाले.

Previous articleयुवा मराठा ब्रेकिंग न्यूज रविकांत तुपकरांना मुंबईतील मरीन ड्राईव्हवर अटक…
Next articleयुवा मराठा ब्रेकिंग पलढग धरण ओर फ्लो…..
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here