
आशाताई बच्छाव
छत्रपती संभाजी नगर येथे अखिल भारतीय पत्रकार संघची बैठक संपन्न…. तालुका प्रतिनिधी जाफराबाद… मुरलीधर डहाके…19/08/2024… सविस्तर वृत्त असे की अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्याची आढावा बैठक हॉटेल सिद्धी छत्रपती संभाजी नगर येथे दत्तप्रसाद अंबिलवादे राज्य संघटक वसंतरावजी देशमुख राज्य संपर्कप्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. असून पत्रकाराना येणार्या अडीअडचणी समस्या व पत्रकारिता एक संधी याविषयी देशमुख सरांनी सखोल मार्गदर्शन केले आपल्या हाती असलेल्या पत्रकारितेच्या आसराने सर्वसामान्य वंचित दुर्बल आर्थिक घटकातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा असे दत्तप्रसाद अंबिलवादे यांनी सांगितले यावेळी छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे जिल्हा संपर्कप्रमुख जगदीश बुलबुले यांची प्रमुख उपस्थिती होती
याप्रसंगी जालना जिल्हाअध्यक्ष कृष्णाराव लहाने ,सुनील उबरकर तालुका उपाध्यक्ष भोकरदन, श्री मुरलीधर डहाके तालुकाध्यक्ष जाफराबाद ,शालिग्राम जी आहेर तालुका कार्याध्यक्ष भोकरदन, आदींची उपस्थिती होती आलेल्या सर्व मान्यवरांचे जिल्हाध्यक्ष नात्याने संदीप शिंदे यांनी स्वागत करून आभार मानले .