Home पुणे रक्षाबंधनाचा बहिण -भावाच्या प्रेमाचा पवित्र सण

रक्षाबंधनाचा बहिण -भावाच्या प्रेमाचा पवित्र सण

34
0

आशाताई बच्छाव

1000657662.jpg

दैनिक युवा मराठा न्यूज पुणे जिल्हा ब्युरो चीफ श्री प्रशांत नागणे आनंदी वातावरणात सर्वत्र पार पडणार रक्षाबंधन सोहळा आज रक्षाबंधन खूप मोठ्या जोशामध्ये आणि उत्साहात साजरा करणारा सण प्रत्येक बहिणाबाई वर्षभरामधून खूप आतुरतेने या दिवसाची वाट पाहत असते रक्षाबंधन हा सण हिंदू धर्मामध्ये साजरा केला जाणारा सण आहे हा सण भाऊ बहिणीचा पवित्र सण आहे श्रावण महिन्यात येणारा हा सण हिंदू धर्मामध्ये पवित्र सण मानला जातो हा सन श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो देवाने प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक भावाला एक बहीण दिलेले असते जी प्रत्येक सुखदुःखामध्ये भावाच्या खांद्याला खांदा लावून उभे असते आई नंतर काळजी घेणारे कोण असेल तर ती लाडकी बहीण ही अनेक रूपामध्ये घरात वावरत असते तिचे भावावरती अतोनात प्रेम असते ते भावासोबत आईसारखी माया करते वेळप्रसंगी भावाची मैत्रीण होते घरातील भाऊही सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने आपल्या बहिणीशी बोलूू शकतो असं निखळ आणि स्वच्छ नातं असतं ते बहीण भावाचे वेळ प्रसंगी भाऊ बहीण खूपचिडतात भांडणे करतात पण एकमेकांशिवाय वेगळे कधीच राहत नाही बहिण भावाकडून वेगवेगळे हट्ट करून घेते आणि ती हट्ट पुरवण्याचे जबाबदारी लाडक्या भावाची असते आणि तो ती जमेल तशी पार पाडण्याचा प्रयत्न करतअसतो जगामध्ये बहिणीची जागा कोणीच घेऊ शकत नाही माझ्याही आयुष्यामध्ये लहानपणापासून माझी काळजी घेणारे वेळप्रसंगी मला खडसावणारे मला चांगल्या मार्गावरती जाण्यासाठी सपोर्ट करणारी माझी लाडली बहिणाबाई स्वप्नाली नागणे जोपर्यंत सोबत होती तोपर्यंत कधीच तिची किंमत कळाली नाही सारखी भांडणे एकमेकांना हांनेमारणे याव्यतिरिक्त दुसरे कामे नव्हते परंतु ज्यावेळी ते लग्न करून सासरी जाते त्यावेळी घरामध्ये प्रत्येक सेकंदाला मिनिटाला तिची किंमत समजते आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी मोठी संकट आली पण भिंती सारखी माझ्या पाठीमागे राहून मला आशीर्वाद देऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी जो सपोर्ट तिने केला तो खूप मोठा आहे त्याची परतफेड मी या जन्मा तरी करू शकत नाही खरंच प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यात एक तरी लाडकी बहीण असावी ज्यामुळे त्याचे आयुष्य सार्थकी लागेल रक्षाबंधन दिवशी प्रत्येक बहीण प्रत्येक भावाच्या मनगटावर ते एक धागा बांधते तो धागा नसून भावाने कोणत्याही संकटामध्ये आयुष्यभर बहिणीचे रक्षण करणे ही वचनपूर्ती असते , रक्षाबंधन या सणाची एक आख्यायिका आहे देवासुर संग्रामात देवांचा विजय व्हावा यासाठी इंद्राणीने इंद्राच्या हाताला राखी बांधली होती अभिमन्यूच्या सुरक्षेसाठी कुंतीने त्याला राखीी बांधली होती प्रत्येक स्त्रीकडे विकृत दृष्टीने न पाहता तिच्याप्रती पवित्र दृष्टी ठेवा असा महान संदेश देणाऱ्या या भारतीय संस्कृतीच्या सर्वश्रेष्ठ सणाला आपण सर्वजण कुटुंबात साजरा करतो समाजात स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे सख्ख्या बहिणीने सख्ख्या भावाला राखी बांधण्यापेक्षा समवयस्कर एखाद्या बहिणीने दुसऱ्या भावाला राखी बांधल्यास त्यामध्ये शील रक्षणाची जबाबदारी येते या सणाचा छोटासा सारांश असा की रक्षाबंधन म्हणजे स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे रक्षाबंधन म्हणजे भावाने बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी घेणे रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाच्या शुद्ध प्रेमाचा वाहता झरा असा संदेश देणारा भारतातील अमूल्य संस्कृतीचा देन म्हणजे रक्षाबंधन

Previous articleआयुर्वेदिक दवाखाना लाखोरी येथे आयुर्वेदिक शिबिर संपन्न
Next articleबागलाण तालुक्यातील नामपुर येथे डॉक्टर युनियनचा मूक मोर्चा
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here