Home नांदेड शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात : गिरीश महाजन

शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात : गिरीश महाजन

58
0

आशाताई बच्छाव

1000653256.jpg

शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर विकासाचे आलेख उंचावतात : गिरीश महाजन

भोकर तालुक्यामध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते 927 कोटींच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण.

मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार

नांदेड दि. 17 ऑगस्ट : केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना विकासासाठी आपल्या पुढ्यात उभ्या आहेत. ज्या लोकप्रतिनिधीमध्ये लोकभावना व ज्यांच्याकडे लोकजागृती आहे. लोकांबद्दल कणव आहे. त्यांच्या मतदार संघामध्ये विकास धावत असतो. शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीवरच विकासाचे आलेख उंचावतात, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पर्यटन मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आज येथे केले.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे जिल्हास्तरीय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या सोबत भोकर मतदार संघामध्ये एकाच दिवशी 926.71 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या #भूमिपूजन व #लोकार्पण सोहळ्या दरम्यान बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या कामाच्या पद्धतीमध्ये पाठपुराव्याला प्रचंड महत्त्व आहे. त्यामुळे भोकर सारख्या शहरात आज मोठमोठे प्रकल्प उभे राहत असून राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या सर्व योजनांची योग्य अंमलबजावणी सुरू आहे. जो समाज, जो समाज घटक आणि जे नेतृत्व उपलब्ध योजनांचा योग्य वापर करेल त्यांच्या विकासाचा आलेख कायम उंच राहतो असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

नांदेड जिल्ह्यातील भोकर येथे आज नगर परिषदेच्या अंतर्गत श्री संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. सात कोटी खर्च करून हे स्मारक उभारले जाणार आहे. त्यानंतर उपस्थित मान्यवरांना संबोधित करताना त्यांनी सरकारच्या सर्व योजना समाजाच्या उन्नतीसाठी वापरणे आणि त्या योग्य प्रकारे वापरल्या जात आहे अथवा नाही याची खातरजमा करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमाला पालकमंत्र्यासह माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ.अजित गोपछडे, आ. राजेश पवार, आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल, अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, माजी आमदार अमर राजूरकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंगाराणी अंबुलगेकर, श्रीजया चव्हाण, रोहिदास जाधव, अॅडवोकेट रामराव नाईक विनोद चीदगीरीकर धर्मगुरू महंत बाबुसिंगजी महाराज (संस्थान पोहरादेवी), दीक्षागुरु संत प्रेमसिंगजी महाराज (संस्थान माहूर व कोतापल्ली), श्री संत सेवालाल महाराज समितीचे अध्यक्ष डॉ. यु. एल. जाधव यांच्यासह बंजारा समाजातील समाज भूषण, ज्येष्ठ नेते, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी देखील संबोधित केले. भोकरचा अनुशेष पूर्ण केल्या जाईल. या मतदारसंघाने कायम चव्हाण कुटुंबावर विश्वास टाकला आहे. त्यामुळे विकास कामांसाठी निधी कमी पडणार नाही. याची काळजी घेतली जाईल असे आश्वासन यावेळी दिले. अन्य मान्यवरांची ही यावेळी मार्गदर्शन झाले.

तत्पूर्वी आज दिवसभरात 926.71 कोटी रूपयांच्या विकास कामांचे उद्घाटन झाले. यामध्ये प्रामुख्याने पिंपळढव साठवण तलाव आणि रेणापूर-सुधा बृहद लघु पाटबंधारे प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या कामाचा उल्लेख करावा लागेल. या प्रकल्पांमुळे भोकर तालुक्याच्या सिंचन क्षमतेत वाढ होणार असून, भोकर शहरासह अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

तत्पूर्वी आज सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह भोकर येथे अस्तित्वातील विश्रामगृहावर समस्थर विस्तारीकरण करण्याच्या 6 कोटी 87 लाख रुपयाचे कामाचे लोकार्पण झाले. भोकर विश्रामगृहाचे रूप यामुळे पालटले आहे.

त्यानंतर माझी लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम झाला. त्यानंतर नांदा म.प. भोकर येथे जिल्ह्याच्या भोकर तालुक्यातील राज्यमार्ग 251 धावरी-थेरबन-सोमठाणा-किनी-पाळज-दिवशी लगळुद राममा तुराटी-बोथी-बितनाळ-सोमठाणा-गोरठा-जामगाव-कुदळा-बोळसा-भायेगाव-अंतरगाव-सावरखेडा-कृष्णूर रामा-419 रस्त्याची हुडको अंतर्गत सुधारणा करण्याच्या व. कि.मी.0/00 ते 42/200 असे 550 कोटी रुपयांचे कामाचे भूमिपूजन झाले.

त्यानंतर परिसरातील शेतकरी व मान्यवरांच्या उपस्थितीत पिंपळढव साठवण तलाव ता. भोकर जि. नांदेड माती धरण सांडवा मुख्य विमोचक व मुख्य कालव्याचे काम व रेणापुर सुधा प्रकल्प बृ.ल.पा.प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या येथे 116 कोटी 48 लाख रुपयाच्या कामाचे भूमिपुजन करण्यात आले.

त्यानंतर हायब्रिड ॲन्युईटी कार्यक्रम टप्पा-2 ND –II 33 बी पिंपळढव, बल्लाळ तांडा, मोघाळी कामणगाव एमडीआर 97 किमी 0/000 ते 20/000 ता. भोकर जि. नांदेड रस्त्याची सुधारणा, भोकर येथील सा.बां. विभागीय कार्यालय इमारतीचे बांधकाम , उपविभागीय कार्यालय व तहसिल कार्यालय भोकर येथील महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी निवासस्थानांचे बांधकाम ,भोकर येथील 30 खाटाच्या रुग्णालयाचे 100 खाटाच्या उपजिल्हा रुग्णालय श्रेणीवर्धन अंतर्गत निवासस्थानाचे बांधकाम. भोकर शहरातील गावतलावाचे पुर्नरुज्जीवन व सुशोभिकरण. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकर येथील प्रशासकीय इमारतीचे बांधकाम, नगरपरिषद, भोकर अंतर्गत बालाजी मंदिर ते बोरगाव रस्त्याची सुधारणा, भोकर शहरासाठी वळण मार्गावरील बांधकामाचे लोकार्पण करण्यात आले.

Previous articleसंत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन.
Next articleनाशिक येथील मुंबई नाका परिसरात डि मार्ट मध्ये चोरी करणारा इसम गुन्हे शोध पथकाकडून पकडण्यात यश आले
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here