Home उतर महाराष्ट्र आयुर्वेद मानवी जीवनासाठी संजीवनी – बाबासाहेब दिघे

आयुर्वेद मानवी जीवनासाठी संजीवनी – बाबासाहेब दिघे

23
0

आशाताई बच्छाव

1000652636.jpg

आयुर्वेद मानवी जीवनासाठी संजीवनी – बाबासाहेब दिघे
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी): मानवी जीवनामध्ये दीर्घायुष्य लाभण्यासाठी पूर्वीपासून आयुर्वेद हा जीवनाचा घटक बनलेला आहे.अपंग सामाजिक विकास संस्था आणि आसान दिव्यांग संघटनेने दत्तनगर सारख्या ग्रामीण भागामध्ये मोफत आयुर्वेद तपासणी व उपचार शिबिर आयोजित करून दिव्यांग बांधवां बरोबरच दत्तनगर परिसरातील सर्वसामान्य रुग्णांवर पंचकर्म आणि आयुर्वेद चिकित्सा पद्धतीनुसार मोफत औषधोपचार हा अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी राबविला आहे.त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. सातत्यपूर्ण दिव्यांगांसाठी काम करत असताना आयुर्वेद हे मानवी जीवनासाठी नक्कीच लाभदायक आणि संजीवनी ठरत असताना त्याचा प्रचार आणि प्रसार होणे देखील आणि ग्रामीण भागातील लोकांना त्याची माहिती होणे अत्यंत आवश्यक आहे.हा उपक्रम अतिशय कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन माजी जि.प.सभापती बांधकाम विभाग बाबासाहेब दिघे यांनी केले.
दत्तनगर ग्रामपंचायत, अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर,आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र,श्रीरामपूर आयुर्वेद प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दत्तनगर ग्रामपंचायत कार्यालय या ठिकाणी दत्तनगर परिसरातील सर्व रुग्णांकरिता मोफत आयुर्वेद तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमासाठी दत्तनगर ग्रामपंचायतच्या सरपंच सारिका कुंकूलोळ,सदस्य प्रेमचंद कुंकूलोळ,अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड चेअरमन संजय साळवे,मा.सरपंच सुनील शिरसाठ,आयुर्वेद संमेलन अध्यक्ष डॉ.सतीश भट्ट,डॉ.महेश क्षिरसागर,डॉ.अमित मकवाना,डॉ.महेंद्र बोर्डे,डॉ.महेंद्र शिंदे,डॉ.विजय कबाडी,डॉ.विराज कदम,डॉ. पामिनी,डॉ.ज्योती,डॉ.नारायण, ग्रामसेवक रुबाब पटेल,तलाठी विकास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी डॉ.महेश क्षिरसागर यांनी आयुर्वेद आणि मानवी जीवन याच महत्त्व विषद केलं.अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी शिबिरामागील उद्देश आणि आयुर्वेद मानवी जीवनाची सांगड कशी चालतो यांवर भाष्य केले. डॉ.सतिश भट्टड यांनी आयुर्वेदीक औषधी गुणधर्म व त्याचे मानवी जीवनावर होणारे सकारात्मक परिणाम यांची सविस्तर माहिती दिली.
शिबीरात 158 रूग्णांवर पंचकर्म चिकित्सा करण्यात आली.शिबीर यशस्वी करण्यासाठी दत्तनगर ग्रामपंचायत सदस्य शाकिरा बागवान,विशाल पठारे, सुरेश शेवाळे,सुरेश शिवलकर,दिनेश तरटे,चंद्रकांत त्रिभुवन,महेंद्र दिवे, सुनील दिवे,रंगनाथ पुजारी,सौ. विमल जाधव,ग्रामपंचायत कर्मचारी राजकुमार माघाडे, राहुल आल्हाट,कडू मावशी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुश्ताक तांबोळी यांनी केले तर आभार चंद्रकांत त्रिभुवन यांनी मानले.

Previous articleमुंबई येथील मराठी पत्रकार भवन येथे एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा च्या वतीने पत्रकार परिषद संपन्न
Next articleदिव्यांग व्यक्ती करिता विशेष घरकुल योजना राबवावी – संजय साळवे
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here