Home वाशिम सोयाबीन मध्ये सात फूट लांब अजगर….. शेतकरी बांधवांनी खबरदारी घ्यावी….

सोयाबीन मध्ये सात फूट लांब अजगर….. शेतकरी बांधवांनी खबरदारी घ्यावी….

168
0

आशाताई बच्छाव

1000617567.jpg

वाशीम ( गोपाल तिवारी )
सोयाबीन मध्ये सात फूट लांब अजगर….. शेतकरी बांधवांनी खबरदारी घ्यावी….
वाशीम जिल्ह्यातील वनोजा येथील स्वप्नील रोकडे यांच्या शेतात त्यांना एक मोठा साप दिसून आला.त्यांनी तत्काळ संबधित माहिती एम एच २९ हेल्पिंग हॅण्ड वाईल्ड ऍडवेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा वाशिम चे सदस्य शुभम हेकड यांना मिळताच ते तत्काळ आपले सहकारी करण जाधव व संघटनेचे अध्यक्ष आदित्य इंगोले यांच्या सह घटनास्थळी दाखल झाले.व पाहणी केली असता सोयाबीन मध्ये अंदाजे ७ फुट लांब अजगर बसलेला होता यावेळी सदर अजगराला मोठ्या शिताफीने संघटनेच्या सदस्यांनी पकडले.यांनतर सदर माहिती कारंजा – मंगरूळपीर वनपरीक्षेत्राचे वनाधिकारी मा.अमित शिंदे तसेच वनपाल सुदर्शन सोनवणे व वनरक्षक मनिष हुमने यांना दिली.यांनतर वनविभागाने रीतसर पंचनामा करून सदर अजगराला वनपरिक्षेत्र अधिकारी मा.अमित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनोजा येथील प्रादेशिक जंगलामध्ये सोडून जीवदान दिले.४-५ दिवसांआधी सुद्धा मानोरा तालुक्यातील कारखेडा येथील शेतात सुद्धा १२ फुट लांबीचा अजगर निघाला होता.सद्ध्या शेतीचे कामे निंदन, कीटकनाशके फवारणी चे कामे जोरात सुरू आहे.त्यामुळे शेतकरी बांधवांनी तसेच मजुर वर्गांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन एम एच २९ हेल्पिंग हॅण्ड वाईल्ड ऍडवेंचर अँड नेचर क्लब यवतमाळ शाखा वाशिम चे सदस्यांनी केले आहे.

Previous articleराज्यातील कार्यरत ३१०५ विशेष शिक्षकांना सेवेत सामावून घेणार
Next articleजिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा म्हैसपूर येथील तीन विद्यार्थ्यानी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here