Home उतर महाराष्ट्र शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही – आ. कानडे

शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही – आ. कानडे

43
0

आशाताई बच्छाव

1000606231.jpg

शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही – आ. कानडे
श्रीरामपूर,(दिपक कदम तालुका प्रतिनिधी)- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागाबरोबरच श्रीरामपूर शहरातील विकास कामांना प्राधान्य देऊन आपण कोट्यावधी रुपयांची कामे केली. यापुढेही शहरातील विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार लहू कानडे यांनी दिली.
शहरातील प्रभाग चारमध्ये केलेल्या विकास कामांबद्दल या प्रभागातील नागरिकांच्यावतीने आ. कानडे यांना विकास सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर, तालुका अध्यक्ष अरुण पाटील नाईक, माजी नगरसेवक अशोक (नाना) कानडे, सतीश बोर्डे, सचिन जगताप, राजू साळवे, दीपक कदम व्यासपीठावर होते.
यावेळी बोलताना आ. कानडे म्हणाले, गेल्या चार वर्षात मतदार संघात आपण मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. कामे करताना दुजाभाव केला नाही. ग्रामीण भागाबरोबरच शहरातील विकास कामांना प्राधान्य दिले. श्रीरामपूर एमआयडीसीत 220 केव्हीचे हाय पॉवर सबस्टेशन मंजूर केल्याने एमआयडीसीतील उद्योगांमध्ये वाढ होऊन तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. स्मशानभूमीमध्ये विद्युत गॅस दाहिनी बसविली. कोरोना काळात ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली. तसेच शहरातील विविध भागातील रस्त्यांसह तरुणांसाठी ओपन जीम्सची उभारणी केली. समाज मंदिरासाठी निधी देऊन विविध भागात पेविंग ब्लॉक बसविले. यापुढेही शहरातील विकास कामांना भरीव निधी देऊन विकास कामे केली जातील.
सचिन गुजर म्हणाले, विकास कामे करताना आ. कानडे यांनी कोण आपला, कोण विरोधक हे न पाहता कामे केली आहेत. आता आगामी निवडणुकीच्या निमित्ताने अनेकांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत. परंतु शहरातील जनता सुज्ञ असून ती विकास कामांबरोबर राहील. यावेळी अरुण पाटील नाईक, अशोक (नाना) कानडे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोरावकेनगर, अतिथी कॉलनी, आशीर्वादनगर, पठाण वस्ती, रेव्हन्यु कॉलनी या भागातील नागरीकांनी आ. कानडे यांना या भागातील कामे केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी अतिथि कॉलनी विकास मंडळाचे अध्यक्ष ऍड. बाबासाहेब मुठे, व्ही. एम. कुलकर्णी, सुभाष लिंगायत, धुमाळ सर, नाईक सर, गंधे सर, ऍड कारखानीस, फापाळे सर, वाणी सर, प्रदीप आखेगावकर, पोटघन सर, हिंगणीकर साहेब, श्री. लोखंडे, रायपल्ली साहेब, जोशी सर, कर्डीले, वाघ नाना, विकास लिंगायत, डॉ. गोकुळ मुठे, पाटील सर, अमोलिक सर, बाबासाहेब मुठे, प्रकाश देशमुख, सुरंजन साळवे, विलास कुलकर्णी, मुकुंद नरवडे, पाटील सर, सचिन मुळे, अधिक जोशी, चंद्रकांत वायकर, राकेश दुशिंग, लेविन भोसले, अश्फाक शेख, संजय जोर्वेकर, निशिकांत पंडित, शरद पंडित, सौ. धुमाळ, सौ. आखेगावकर, सौ. रायपल्ली, संगीता मुठै, ललिता टाकसाळ, सुमित्रा लिंगायत, प्रतिमा पंडित, अंजली कारखानीस, संगीता लटमाळे, मनीषा मुठे, वैशाली जोशी आदींसह नागरिक उपस्थित होते.
……..

Previous articleरघु नवरे यांच्याकडून बागलाण विधानसभेसाठी तयारी
Next articleविशेष! भाऊपणावर ताईपण भारीच ! -भाऊ -ताई एकत्र आल्यास विधानसभेवर झेंडा !
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here