आशाताई बच्छाव
एन सी सी “बी” व “सी” प्रमाणपत्र उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा.
आदर्शच्या छात्र सैनिकांचे एनसीसी.परीक्षेत यश.
जिल्हा प्रतिनिधी जालना-वसंतराव देशमुख दिनांक १/८/२०२४
सविस्तर वृत्त असे की,हिंगोली दिनांक ३१जुलै येथील आदर्श महाविद्यालयात
एनसीसी “बी” प्रमाणपत्र व “सी” प्रमाणपत्र परीक्षा 2024 मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास आघाव, प्रमुख पाहुणे उपप्राचार्य प्रा.रमेश दळवी समन्वयक डॉ. संजय कयाल ,एनसीसी विभाग प्रमुख मेजर पंढरीनाथ घुगे, निबंधक दिलीप दुबे, डॉ.सोपान खरात व एनसीसी गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते.
एन सी सी “सी “प्रमाणपत्र परीक्षा 2024 मध्ये एकूण 19 विद्यार्थी परीक्षार्थी होते, त्यापैकी 18 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. 14 विद्यार्थी “बी” ग्रेडमध्ये तर चार विद्यार्थी हे “सी” ग्रेड मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत यामध्ये अंभोरे शीलन, धोत्रे ज्ञानेश्वर ,गायकवाड किशन, गायकवाड श्रीराम, घुगे गौरव, घ्यार केदारलिंग, गोरे कुणाल, गुऱ्हाळकर कृष्णा, इंगोले सुरज, कांबळे सतीश, लेकुळे अभिषेक, पवार मंगेश, साखरे शिवदास, शिंदे ओमकार, शिंदे पवन, तनपुरे राजू, वाबळे राजेश, धवसे धनराज यांनी सी प्रमाणपत्र परीक्षेत यश संपादन केलेले आहे.
बी प्रमाणपत्र परीक्षेत एकूण 26 विद्यार्थी परीक्षार्थी होते, ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत 07विद्यार्थ्यांना “ए” ग्रेड व 19 विद्यार्थ्यांना “बी” ग्रेड मिळालेला आहे.
होते यामध्ये भोपे युवराज, गाडगीळ आदिनाथ, कदम विठ्ठल, कोरडे ऋषिकेश, लेमले तुषार, माने सोमेश्वर, पातले वैभव, साबळे कृष्ण, शेख इरफान, शेळके आशिष, शिखरे गौरव ,कुमारी भिसे पल्लवी , फड पल्लवी, गायकवाड राधिका, खिलारे स्नेहा, मस्के गंगासागर ,सावळे शिवानी, शेख नाझिया, श्रीवास्तव रेखा ,सोनाळे राजनंदनी, सोनटक्के सृष्टी, तिवारी राधिका, देवकर शिवराज, गोरे शंकर, नवरंगबादी सोहेल, पठाडे सुनील. यांनी यश संपादक केल्यामुळे त्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
एनसीसी प्रमाणपत्र वाटप व गुणगौरव सोहळा या कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विलास आघाव यांनी एनसीसी छात्र सैनिकांनी या प्रमाणपत्राच्या सोबत एनसीसीचे प्रशिक्षण पूर्ण करून स्वतःच्या व्यक्तिमत्व विकास केलेला आहे .या प्रशिक्षणाचा व प्रमाणपत्राचा उपयोग करत आपण भारतीय सैन्यात अधिकारी व सैनिक म्हणून देश सेवा करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत. तसेच सामाजिक दृष्टिकोनातून सामाजिक एकात्मता अधिक घट्ट करण्यासाठी आपण सतत प्रयत्न करावा असे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेजर पंढरीनाथ घुगे व आभार प्रदर्शन डॉ. सोपान खरात यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.