Home नांदेड एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण · अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कौतुक

एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण · अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कौतुक

29
0

आशाताई बच्छाव

1000600600.jpg

‘एक लाख मराठा ‘ उद्योजकांची संख्या पूर्ण

· अण्णासाहेब पाटील महामंडळाचे कौतुक

· मराठा समाजातील युवकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
नांदेड दि. 1 : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील एक लाख उद्योजकांची संख्या पूर्ण झाली आहे. मराठा समाजाला न्याय देणाऱ्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले असून मंडळाचे अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते सह्याद्री अतिथीगृहावर सत्कार करण्यात आला आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना अंतर्गत आजपर्यंत एक लक्ष 14 लाभार्थी झाले असून या लाभार्थ्यांना 8320 कोटी रुपये बँकांनी व्यावसायिक कर्ज वितरित केले आहेत. त्यापैकी महामंडळांनी 832 कोटी रुपये व्याज परतावा केला आहे.

मराठा समाजाची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ पुनर्रचित केले.या महामंडळाच्या माध्यमातून जुन्या योजना बंद करून नवीन सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले. या महामंडळाचे अध्यक्षपदी अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील यांची नियुक्ती केली होती.

नरेंद्र पाटील यांनी शासनाचे विविध विभागाचे अधिकारी राष्ट्रीयकृत्व सहकारी बँकांचे प्रमुख महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अधिकारी कर्मचारी लोकप्रतिनिधी लाभार्थी तसेच अन्य संबंधितांनी या योजनेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये या संदर्भातील कार्यालय असून मराठा समाजातील युवकांनी आपला नवीन उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या मार्फत मदत घ्यावी असे आवाहन महामंडळाचे स्थानिक समन्वयक शुभम शेवणकर यांनी केले आहे. नांदेड जिल्हयात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित कार्यालय जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, उज्वल गॅस एजन्सी समोर, शासकीय तांत्रिक विद्यालय बाबानगर येथे आहे.

Previous articleसावंगी अवघडराव येथे आढळला डेंग्यूचा 1 रुग्ण
Next articleमाहोरा येथे महसूल दिनानिमित्त मा. उपविभागीय अधिकारी श्री. दयानंद जगताप व जाफराबाद तहसीलदार सरिता भगत त्यांच्या हस्ते वृक्षारोपण
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here