आशाताई बच्छाव
सावंगी अवघडराव येथे आढळला डेंग्यूचा 1 रुग्ण
प्रतिबंधात्मक उपाययोजनांची मागणी, डासांचा प्रादुर्भाव वाढला……. जाफराबाद जालना प्रतिनिधी… मुरलीधर डहाके .01/08/ 2024
भोकरदन तालुक्यातील सावंगी अवघडराव येथे डेंग्यू चा 1 रुग्ण आढळले असून त्याच्यावर औरंगाबाद संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र व सावंगी अवघडराव ग्रामपंचायत यांनी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
सावंगी अवघडराव येथील अमान सलमान शहा वय 9 वर्ष या लहान मुलाला डेंग्यूचे लक्षण आढळल्याने त्याला ऊपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दोन दिवसांपूर्वी तापाची चढ-उतार लक्षात घेता त्यांची रक्ताची तपासणी केल्यानंतर डेंग्यूची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली असून.
अमान शहा याच्यावर औरंगाबाद संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.
गावात आणखीन काही जणांना लक्षणे दिसून येत असल्याने पूर्ण गावाचे आरोग्य विभागाने सर्वेक्षण करण्याची मागणी होत
गावात डेंगीचे रुग्ण आढळून आल्यानंतर वावी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.अहमद अलकसेरी, डॉ.विनोद सांवगीकर
यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय पथकाने गावात सर्वेक्षणास प्रारंभ केला आहे. आशा सेविकांचे पथके या सर्वेक्षणात सहभागी झाले आहे. डास प्रतिबंधात्मक धुराळणीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पत्र दिले आहे.काही ठिकाणी गवत मोठ्या प्रमाणात उगवल्यामुळे डासांना पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या आणखी वाढू नये, यासाठी संपूर्ण गावात सर्वेक्षणासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.