Home उतर महाराष्ट्र लाडकी बहिण व लाडका भाऊ सारखी लाडका दिव्यांग योजना करिता प्रयत्न करू...

लाडकी बहिण व लाडका भाऊ सारखी लाडका दिव्यांग योजना करिता प्रयत्न करू – तहसीलदार मिलिंद वाघ

160
0

आशाताई बच्छाव

1000600460.jpg

लाडकी बहिण व लाडका भाऊ सारखी लाडका दिव्यांग योजना करिता प्रयत्न करू – तहसीलदार मिलिंद वाघ
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी: आज 1 ऑगस्ट महसूल दिन,लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीरामपूर तहसील कार्यालयावर आसान दिव्यांग संघटना व अपंग सामाजिक विकास संस्थेच्या वतीने दिव्यांगांच्या विविध समस्या संदर्भात विचार विनिमय बैठक तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या समवेत दिव्यांग बांधवांची बैठक संपन्न झाली.या बैठकीमध्ये अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे यांनी दिव्यांगांच्या पुढील समस्यांचे विवेचन केले.1) संजय गांधी निराधार योजनेतील प्रकरणे नियमित व वेळेवर मंजूर करणे,2)दरमहा मानधन वेळेवर मिळणे संदर्भात 3)शासन निर्णयानुसार प्रत्येक दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा 4)श्रीरामपूर शहरातील व तालुक्यातील प्रत्येक शासकीय इमारतीमध्ये विनाअडथळा सुविधा करणे 5) दिव्यांग व्यक्ती महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र सुलभ शौचालय सुविधा निर्माण करणे 6) दिव्यांग व्यक्ती करिता स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत विशेष घरकुल योजना राबविणे 7) लाडकी बहीण व लाडका भाऊ योजना महाराष्ट्र शासनाने कार्यान्वित केली आहे.मग लाडका दिव्यांग ही योजना राबविण्यात यावी व दरमहा दिव्यांग बांधवांना सहा हजार रुपये प्रति महिना मानधन मिळावे 8) दिव्यांग कायदा अधिनियम 2016 ची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे गरजेचे आहे 9)स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत दिव्यांग व्यक्तींच्या व्यवसाय करिता मोफत आरक्षित गाळे उपलब्ध करणे संदर्भात 10) स्थानिक स्वराज्य संस्था मार्फत दरवर्षी 5 %निधीचे वाटप वेळेवर करण्यात यावे या मागण्या त्यांनी तहसीलदार मिलिंद वाघ यांच्यासमोर अतिशय अभ्यासपूर्ण सविस्तरपणे मांडल्या
सदर सर्व समस्यांवर तातडीने उपाययोजना करून त्यावर निर्णय घेण्यासंदर्भात बैठक आयोजित करून महसूल पंधरवाडा निमित्त महसूल विभाग आणि समाज कल्याण विभाग यांच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालय श्रीरामपूर या ठिकाणी दिव्यांग दरबार भरविण्यात येणार आहे.त्यामध्ये दिव्यांगांच्या विविध समस्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना करणे बाबत योग्य ते निर्णय घेऊन प्रकरणे निकाली काढण्यात येतील त्याचबरोबर प्रशासकीय इमारतीमध्ये दिव्यांगांना सुलभतेने वरती येता यावे याकरिता लिफ्ट ची सुविधा करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्यात येईल.दिव्यांग महिला व पुरुषांकरिता स्वतंत्र सुलभ शौचालय व्यवस्था तळमजल्यावर करण्यात येईलअसे प्रतिपादन तहसीलदार मिलिंद वाघ साहेब यांनी सर्व संघटना पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन आश्वस्त केले.
त्यापुर्वी प्रांताधिकारी किरण सावंत यांनी समाज कल्याण विभाग प्रतिनिधी संजय साळवे यांच्या समवेत दिव्यांग व्यक्तींच्या विविध समस्या संदर्भात सविस्तर चर्चा करुन त्यावर समाधान कारक उपाययोजना करणे बाबत विचार विनिमय करून तहसीलदारांसमवे नियोजन करण्यासाठी सुचित केले.
याप्रसंगी आसान दिव्यांग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष मुश्ताक भाई तांबोळी,अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड,आसान दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष सुनील कानडे खजिनदार सौ.साधना चुडीवाल आणि खोकर शाखेचे अध्यक्ष विकास साळवे आणि महिला तालुकाध्यक्ष प्रमिला कानडे, राजेंद्र मगर,गंगाधर सोमवंशी,कु फरजाना पठाण यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश बनसोडे,जीवन पवार, संदिप भोंगळ,आजीनाथ भुईगड,आदम शेख, रंगनाथ पुजारी,वेदांत पवार नी विशेष परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here