Home भंडारा अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज: – राहुल डोंगरे ( राजापूर येथे गोबरवाही...

अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज: – राहुल डोंगरे ( राजापूर येथे गोबरवाही पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादन)

29
0

आशाताई बच्छाव

1000597702.jpg

अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज: – राहुल डोंगरे
( राजापूर येथे गोबरवाही पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित प्रबोधन कार्यक्रमात प्रतिपादन)

 

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) जादूटोणा,भूत – भानामती,करणी, मंत्रतंत्र ,चेटूक,चमत्कार,देवी अंगात येणे, जोतीष्य,बुवाबाजी या केवळ अंधश्रद्धा आहेत.या प्रकारांना अशिक्षितांप्रमाने सुशिक्षित सुद्धा नेहमी बळी पडत असतात.यातून समाजात,गावागावात भांडणे निर्माण होवून एखाद्याचा बळी घेतला जातो.अश्या घटना होवू नयेत,यासाठी सरपंच,पोलीस पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष ,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,ग्रामसेवक,पटवारी यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.संबधित गावात ही मंडळी अप्रतिम असे समुपदेशन करून गावकऱ्यांच्या डोक्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करू शकतात.तर सहजतेने अंधश्रध्देचे निर्मूलन करता येईल.यातून राष्ट्रहित जोपासता येईल.यास्तव अंधश्रद्धा निर्मूलन ही काळाची गरज आहे,असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तुमसर तालुका संघटक प्रा.राहुल डोंगरे यांनी केले.
गोबरवाही पोलीस ठाणेच्या वतीने ‘ राजापूर ‘ येथे आयोजित अंधश्रद्धा निर्मूलन प्रचार – प्रसार समाज प्रबोधन कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद गिरी होते.
यावेळी अतिथी म्हणून अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका तुमसर चे सहसचिव किशोर बोंद्रे आणि सल्लागार अनिल भुसारी होते.
राहुल डोंगरे म्हणाले ,शकुन व नवस,गंडेदोरे,ताईत,ग्रहांचे खडे,मंत्र तंत्र यांना सत्याचा आधार नाही. जोतीष्य, हस्तरेखाशास्त्र विज्ञान नाही. अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे.त्याचे निर्मूलन कसे करता येईल याकरिता प्रा.राहुल डोंगरे यांनी वैज्ञानिक प्रयोगातून अग्नी प्रज्वलित केले.कानाने चिट्टीवरील नावे वाचून दाखविले.जळते कापूर भक्षण करून दाखवले.निंबुतून केस काढून दाखविले. पेचकस द्वारे तांदुळ भरलेला तांबे वर उचलून दाखविले.वैज्ञानिक प्रयोगातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.भंडारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक लोहित मतानी,अप्पर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे,आय.पी. एस . रश्मिता राव तुमसर पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी या उपक्रमाला चालना दिल्यामुळे अनेकांचे गैरसमज दूर होतील व कुणीही भोंदू बाबांना बळी पडणार नाही असे अपेक्षित आहे.यावेळी सरपंच महाप्रकाश परबते,उपसरपंच सौ.वर्षा लाहुत्रे,पोलीस पाटील दिवाकर डोंगरे,मंगेश पेंदाम,नितीन मडावी आदीसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन सरपंच महाप्रकाश परबते यांनी केले.तर आभार पोलीस नाईक मंगेश पेंदाम यांनी मानले.पोलीस जिल्हा पोलीस विभागातर्फे राबवित असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन ” प्रचार व प्रसार” कार्यक्रमाची नागरिकांकडून स्तुती केली जात आहे. हे विशेष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here