Home वाशिम वाशिम शहराचा विकास सर्वांना सोबत घेवून करणार – खा. संजय देशमुख

वाशिम शहराचा विकास सर्वांना सोबत घेवून करणार – खा. संजय देशमुख

131
0

आशाताई बच्छाव

1000561909.jpg

वाशिम शहराचा विकास सर्वांना सोबत घेवून करणार – खा. संजय देशमुख
वाशिम नागरिक सद्भावना समितीच्या वतीने भव्य सत्कार
वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ)- वाशिम नागरिक सद्भावना समितीकडून गुरुवार, १८ जुलै रोजी खा. संजय देशमुख यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा वाशिमकरांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये स्थानिक लाखाळा येथील तिरुपती लॉन येथे संपन्न झाला.
याप्रसंगी खा. संजय देशमुख यांनी सत्काराला उत्तर देतांना म्हटले की, सद्भावना समितीकडून वाशिम शहरासह परिसर व जिल्ह्याचा अनुशेष भरुन काढत विकासात्मक दहा मुद्यावर ज्यामध्ये शहरातील रस्ते, वाहतूक, पिण्याचे पाणी, ड्रेनेज, कचरा निर्मूलन या महत्वपूर्ण समस्यसमस्या मार्गी लावत रेल्वे, औद्योगीक विकासामध्ये भर ज्यामध्ये नव्याने एखादा नविन साखर कारखाना उभारणी करता येईल का, त्याचप्रमाणे शेतकर्‍यांच्या हितार्थ सोयाबीन संशोधन केेंद्र, नव्याने शासकीय इंजिनिअरींग कॉलेज, अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र, प्रस्तावित वैद्यकिय महाविद्यालय व केंद्रीय महाविद्यालयाच्या इमारतीची जलद निर्मिती, एकबुर्जी धरणाची उंची वाढविणे, जिल्हास्तरीय क्रिडा स्टेडीयम उभारणे, या भागाचा पर्यटन विकास साध्य करुन रोजगार निर्मिती करणे, नविन सिंचन व्यवस्थेसह उर्जानिर्मिती क्षेत्रात वाढ करुन निर्मिती करणे यामुळे वाशिम जिल्ह्याची आकांक्षित जिल्हा म्हणून ओळख पुसण्यास मदत होईल. या व इतर बाबीसह युवक, महिला, शेतकरी व सामान्य नागरिकांचे आयुष्यमान कसे सुधरेल यासह वाशिम शहराचा विकास सर्वांना सोबत घेवून करणार असे भावोद्गार त्यांनी काढले.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून वाशिम नागरिक सद्भावना समितीचे गिरधारीलाल सारडा, समितीचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, सचिव उज्वल देशमुख, कोषाध्यक्ष चंद्रशेखर राठी, समिती संरक्षक, उपाध्यक्ष व कार्यकारीणीसह इतर सर्व सदस्यांनी खा. संजय देशमुख यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि भव्य गुलाबाचा हार घालून सत्कार केला. याप्रसंगी गावातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, लॉयन्स क्लब, जेसीज, महिला संघटनांचे पदाधिकारी, संस्था, संघटना यांनी स्वयंस्फूर्तीचे खासदारांचा मोठया प्रमाणात सत्कार केला.
कार्यक्रमास प्रामुख्याने शहरातील व्यापार्‍यासह युवावर्ग, नागरीक, महिला आवर्जून उपस्थित होत्या. कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता डॉ. नंदकिशोर पराती, अ‍ॅड. अनंत वाघ, राजु वानखेडे, तरणजितसिंग सेठी, पुरणमल बदलाणी, डॉ. नरेशकुमार इंगळे, डॉ. विजय कानडे, राजु जानीवाले, मनिष संचेती, अमोल लक्ष्मणराव इंगोले, पवन पुरुषोत्तम शर्मा, नंदकिशोर अग्रवाल, शैलेश सोमाणी, कृष्णा चौधरी, डॉ. अंगद राऊत, राजेश शिरसाट, भिमराव गंगावणे, उमेश मोहळे, अविनाश चव्हाण, माणिकराव राठोड, दिपकराव कदम, विठ्ठल जोशी, सय्यद रहेबर, मोहन बोरगांवकर, शे. नदीम शे. चांद, विशाल ठाकुर, महादेवराव डाखोरे, अ. नजीर अ. गफुर, उदेभान लांडगे, प्रा. प्रविण गोटे, राजु दारोकार, संजय जितकर, मनेष राजगुरु, अमित गावंडे, महेश शर्मा, ओम आलोकार, किशोर पवार, निलेश लोखंडे, संदीपराव जाधव, संजय शिंदे, सदानंद आलमवार, सुधाकर गोरे, संजय वाघ, शिवाजी देशमुख, धिरज लवंडे, श्रेणीकसा भुरे, डॉ. शशिकांत देशमुख, डॉ. दिलीप इंगोले, डॉ. पराग देशमुख, डॉ. अश्विन पराती, डॉ. सागर दागडीया, संजय इंगोले, तुळशिराम आरु, कैलास मुंदडा, नंदु पवार, दिगांबर निरगुडे, केशव अंभोरे, सुनिल मापारी, गजानन वानखेडे, अर्जूनराव राऊत, विकास सानप, विठ्ठलराव बोरकर, विश्वास गोदमाले, प्रशांत जुनगडे, अ‍ॅड. संजय गोरे इत्यादींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उज्वल देशमुख यांनी तर संचालन अरविंद उलेेमाले व आभारप्रदर्शन सुभाष अंभोरे यांनी केले.

Previous articleअखिल भारतीय भ्रष्ट्राचार निर्मूलन संघर्ष समिती ची मंथन व आढावा बैठक हिंगोली….
Next articleरायगड जिल्ह्यात रील्सना ‘नो ढील’; धोकादायक ठिकाणी बंदी; उल्लंघन केल्यास होणार कारवाई
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here