Home पुणे कुठल्याही आदेशाशिवाय लाखो रुपयांच्या बिलांवर आरोग्य प्रमुखांऐवजी सहाय्यक आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षर्‍या; पाळेमुळे...

कुठल्याही आदेशाशिवाय लाखो रुपयांच्या बिलांवर आरोग्य प्रमुखांऐवजी सहाय्यक आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षर्‍या; पाळेमुळे खोदल्यास मोठी साखळी उजेडात येण्याच्या भितीने प्रकरण ‘गुंडाळण्या’च्या जोरदार हालचाली !

42
0

आशाताई बच्छाव

1000561620.jpg

कुठल्याही आदेशाशिवाय लाखो रुपयांच्या बिलांवर आरोग्य प्रमुखांऐवजी सहाय्यक आरोग्य प्रमुखांच्या स्वाक्षर्‍या; पाळेमुळे खोदल्यास मोठी साखळी उजेडात येण्याच्या भितीने प्रकरण ‘गुंडाळण्या’च्या जोरदार हालचाली !
पुणे ब्युरो चीफ उमेश पाटील
महापालिकेच्या आरोग्य विभागातील गैरव्यवहारावर वरिष्ठ पातळीवरून पांघरूण घातले जात आहे. गेल्या वर्षभरापासून कुठल्याही लेखी आदेशाशिवाय लाखो रुपयांच्या बिलांवर आरोग्य प्रमुखांऐवजी सहाय्यक आरोग्य प्रमुखच स्वाक्षर्‍या करत असल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणाची खोलात जाउन चौकशी केल्यास यामध्ये लेखापाल कार्यालयापर्यंतची साखळी समोर येण्याची शक्यता असल्याने हे प्रकरण ‘गुंडाळण्याची’ तयारी सुरू असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.
आरोग्य विभागालातील अधिकार्‍यांना त्यांच्या पदानुसार खर्च मर्यादा निश्‍चित करून या खर्चाच्या बिलांवर स्वाक्षर्‍या करण्याचे अधिकार आहेत. तत्कालीन आयुक्त डॉ. प्रविणसिंह परदेशी यांनी २००७ मध्ये तसे परिपत्रकही काढले होते. या परिपत्रकात अद्याप तरी कुठलाही बदल झालेला नाही. मात्र, गेल्या साधारण वर्षभरापासून याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून अधिकारात नसतानाही लाखो रुपयांच्या बिलांवर सहाय्यक आरोग्य प्रमुखांकडूनच स्वाक्षर्‍या करण्यात येत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. यासंदर्भातील वृत्त माध्यमांमध्ये आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी याची गंभीर दखल घेतली. याप्रकरणी खात्याअंतर्गत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश आरोग्य विभागाला दिले आहेत. तसेच यापुढे सहाय्य आरोग्य प्रमुखांनी बिलांवर स्वाक्षरी करू नये, असे आदेशही दिले.
अतिरिक्त आयुक्तांनी सहाय्यक आरोग्य प्रमुखांचे स्वाक्षरीचे अधिकार काढून घेणे यातूनच यापुर्वी या पदांवरील अधिकार्‍यांनी बिलांवर स्वाक्षरी केल्याची सर्वच प्रकरणे बेकायदा असल्याचे सिद्ध होेते. परंतु मागील वर्षभरात अंदाजपत्रकात तरतुद असताना बिले काढण्यास विलंब का होत होता? मॅन्युअल बिले तयार केल्यानंतर ती सॅप या पारदर्शक ऑनलाईन सिस्टिमद्वारे लेखा विभागाकडे पाठविण्यास किती विलंब होत होता? प्रत्येक बिलाची काटेकोर तपासणी करणार्‍या लेखा विभागाकडून बिलांवर कोणाची स्वाक्षरी असावी याची तपासणी का गेली नाही?
सॅपच्या बिलांवर आरोग्य प्रमुखांची स्वाक्षरी नसल्याचे दिसत असताना लेखा विभागाकडून त्यावर वर्षभरात किती बिलांवर आक्षेप नोंदविले? खर्च मर्यादेनुसार बिलांवर कोणत्या पदावरील अधिकार्‍याची स्वाक्षरी असावी, असे आयुक्त अथवा आरोग्य प्रमुखांचे सर्क्युलर लेखा विभागाकडे आहे? शहरी गरीब योजना, सीएचएस योजना पारदर्शक, गतीमान करण्यासाठी ती ऑनलाईन ‘सॅप’ पद्धतीमध्ये करताना स्वाक्षरींच्या अधिकाराबाबत तत्कालीन अतिरिक्त आयुक्तांनी काही गाईडलाईन्स अथवा पत्र दिले आहे? अशा अनेक शंकास्पद बाबींची उत्तरे समोर आल्यास धक्कादायक माहिती पुढे येण्याची दाट शक्यता आहे. यामुळेच केवळ निम्नस्तरावरील अधिकार्‍यांच्या स्वाक्षर्‍यांचे अधिकार काढून प्रकरण ‘गुंडाळण्या’ साठी विवीध स्तरावर प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.

Previous articleवानवडी हॉटेल तसेचअनधिकृत हॉटेल दुकानांवर फिरवला बुलडोझर
Next articleपारध पोलिसांची अवघडराव सावंगी येथे अवैध गावठी हातभट्टी दारू विक्रेत्या वर छापा.
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here