Home पुणे महाराष्ट्रातील अधिकृत दैनिक व साप्ताहिक चे संपादक ,पत्रकार यांना मानधन मिळण्यासाठी मुख्यमंत्री...

महाराष्ट्रातील अधिकृत दैनिक व साप्ताहिक चे संपादक ,पत्रकार यांना मानधन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याणी वाघमोडे यांचे निवेदन …

21
0

आशाताई बच्छाव

1000555580.jpg

महाराष्ट्रातील अधिकृत दैनिक व साप्ताहिक चे संपादक ,पत्रकार यांना मानधन मिळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कल्याणी वाघमोडे यांचे निवेदन …
युवा मराठा न्यूज संजय पन्हाळकर बुलढाणा जिल्हा ब्युरो चीफ
बारामती:- बुलढाणा – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा मंत्री, माहिती व जनसंपर्क यांना क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांनी अधिकृत दैनिक व साप्ताहिक संपादक व पत्रकार यांना मानधन मिळणेबाबत निवेदन दिले.विषयास अनुसरून, लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रिंट व डिजिटल मीडिया मधील दैनिक, साप्ताहिक, मासिक चालवणाऱ्या संपादक व पत्रकारांना अनेक गोष्टींना सामोरे जात शासनाच्या व इतर कार्यक्रमांच्या बातम्या सादर करण्यासाठी कसरत करावी लागते. लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या व आवाज उठवणाऱ्या अशा संपादक व पत्रकारांना दर महिन्याला १०००० रुपये मानधन मिळावे, हि अपेक्षा निवेदन देत कल्याणी वाघमोडे यांनी केली.
तसेच शासनमान्य यादीसाठी स्थायी समितीच्या बैठका दरवर्षी वेळेत पूर्ण होऊन तत्काळ निर्णय घेण्यात यावेत. बिगर शासनमान्य यादीवरील दैनिक व साप्ताहिकांना २०१८ पर्यंत दर्शनी ५ जाहिरात मिळत होत्या. परंतु २०१९ पासून हे जाहिरात देणे बंद झाले. त्यामुळे साप्ताहिक व दैनिक चालवणे हे फार आव्हानात्मक झाले आहे. अशा दैनिक साप्ताहिकांना जिवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या मागण्या मान्य कराव्यात, अशी विनंती पत्राद्वारे केली.
यावर निवेदन स्वीकारत बैठकीत विषय घेऊन निर्णय घेऊ असे मत मुख्यमंत्री यांनी व्यक्त केले. आषाढी एकादशीच्या पूजेसाठी मुख्यमंत्री व कुटुंब पंढरपूर कडे बारामती विमानतळ येथून रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here